HPV फक्त सेक्सद्वारे पसरतो का ?

माझ्या वैद्यकीय विद्यार्थिनी सोबत HPV लसीच्या सुरक्षेबाबत बोलत असताना HPV केवळ sex द्वारे पसरतो का असा विषय देखील निघाला.

त्यामुळे २०२४ मधील हा प्रासंगिक लेख पुन्हा शेअर करत आहे.

===================

गेले दोन दिवस पूनम पांडेच्या मृत्यूच्या नाटकाने गाजले. यातून दोन गोष्टी समजल्या .

१. प्रसिद्धीसाठी काही जण कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचीही खिल्ली उडवतात आणि

२. आपल्याला मूर्ख बनवणे किती सोपे आहे. 

कारण बातमी खरी आहे हे न्यूज चॅनेल वरील बातम्यांमुळे जवळजवळ सर्वांना पटले . चार दिवसांपूर्वी गोव्यात पार्टी करणारी स्त्री तडकाफडकी एखाद्या कॅन्सरने मरू शकते हे शक्य नव्हते तसेच ३२ वर्षे वयाला सहसा सर्वायकल कॅन्सरची फक्त  सुरुवात असते आणि कमी वयात झालाच एखादा कॅन्सर तर सहसा वेगाने वाढणारा असतो तो, पार्टी वगैरे विसरायला लावणारा !

या घटनेने दोन परिणाम होतील. एक म्हणजे हा महत्वाचा  आजार आहे व यावर लस आहे ही माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोचल्याने जागृती वाढेल . पण एका पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित कलाकाराने हा प्रसिद्धी स्टंट केल्याने या आजाराची लस घेणे किंवा प्रियजनांना देणे याविषयी कलंकित भावना जोडली जाऊ शकते. ही लस आपल्या मुलींना द्यायची असल्याने या चीप पब्लिसिटी मुळे लोकांचे गैरसमज वाढू शकतात.

विविध बातम्यांमध्ये HPV ला लैंगिक आजार असे सांगितले आहे.
हे चूक आहे का ?
तर नाही!
कारण या विषाणूच्या प्रसाराचा मार्ग त्वचा व श्लेष्मल त्वचा (mucus membrane) यांचा निकटचा संपर्क हा आहे , जो सहसा  लैंगिक क्रियेदरम्यान येतो.

त्यामुळे लैंगिक तसेच निकटचे संबंध हा या विषाणू प्रसाराचा सर्वात महत्वाचा व सर्वसामान्य मार्ग आहे.

मात्र गर्भाशयमुखाच्या कर्करोगामुळे तुमच्या आमच्या वयस्कर नातेवाईक स्त्रियांचे मृत्यू झालेत आणि त्यांचा व पूनम पांडेसारख्या व्यक्तींचा तर अर्थाअर्थी संबंध नाही.

आता या आजाराचा फोकस फक्त लैंगिक संबंधावर राहील तसेच बरेच डॉक्टर देखील चांगल्या घरातील लहान मुलींना लस द्यायची गरज नाही असे म्हणू शकतात म्हणून मी HPV संसर्ग प्रसाराच्या इतर मार्गांविषयी माहिती घेतली .

याविषयी काही पेपर्स मिळाले (फोटो आणि लिंक शेवटी आहेत )

काही महत्वाचे मुद्दे-

१. या विषाणूचा प्रसार लैंगिक क्रियेव्यतिरिक्त देखील झाल्याचे दाखले उपलब्ध आहेत. उदा. संक्रमित वस्तू (fomites) मात्र अश्या नोंदी कमी आहेत.
२. हा विषाणू शरीराबाहेर देखील काही काळ टिकू शकतो.    म्हणजे प्रसाराची शक्यता आहे.
३. बाधित आईकडून जन्मतः बाळाला संसर्ग शक्यता असते .
४. दवाखान्यातील नियमित निर्जंतुकीकरण काहीवेळा या विषाणूला पूर्णपणे काढू शकत नाही.
५. हा विषाणू शरीराच्या ज्या भागामध्ये प्रवेशित होतो , तिथे कर्करोग निर्माण करण्याची क्षमता आहे , म्हणून बऱ्याच देशांमध्ये मुलींसोबत मुलांना देखील HPV ची लस दिली जाते.
६. अनेक वर्षांपूर्वी झालेला विषाणूसंसर्ग जो शरीरात प्रवेश केल्यावर कोणताही आजार निर्माण करून आपल्या आगमनाची खूण दाखवत नाही , अश्या संसर्गाच्या प्रसाराचे मार्ग शोधणे अवघड काम आहे . ही बाधा बऱ्याच स्त्रियांसाठी  जीवघेणी आहे हे मात्र नक्की.

आपल्या डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते.

लवकरच १४ वर्षाखालील मुलींसाठी ही लस राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये उपलब्ध होईल . लस २०- २५ वर्षे वयापर्यंत बऱ्याच देशांमध्ये दिली जाते . सहसा लैंगिक आयुष्य सुरू होण्याआधी लस घेणे सर्वाधिक फायद्याचे असते .

आपल्या शंका अवश्य विचारा . स्वतःसोबत इतरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी शेयर करा .

-डॉ. प्रिया प्रभू, MD रोगप्रतिबंधकशास्त्र तज्ञ, मिरज (३/२/२४)

या लसी विषयी जर इतर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे पुढील लेखामध्ये सापडते. लिंक

तुम्ही स्त्री असाल तर स्वतःसाठी आणि पुरुष असाल तर तुमच्या स्त्री नातेवाईकांसाठी हा लेख देखील अवश्य वाचा.

तसेच महत्त्वाच्या आरोग्य संबंधी विषयांच्या फेसबुकवरील आणि ब्लॉगवरील माझ्या पोस्ट चुकू नयेत असं वाटत असेल तर माझे व्हाट्सअप चॅनल देखील जॉईन करू शकता. (मोबाईल नंबर उघड होत नाही.)

अभ्यासाचे screenshots

A 2020 paper about various ways of transmission of HPV
A screenshot of a study (link below) stating the non sexual routes of HPV transmission

Studies

https://obgyn.onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jog.13248

https://www.tandfonline.com/doi/epdf/10.1586/14787210.2014.959497?needAccess=true


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com