HPV लस उपयुक्त आहे का?

HPV ल स उपयुक्त असल्याचा एक पुरावा आहे का?
#HPV_Prevention_DrPriya 10

(Cervical cancer विरुद्धची लस लवकरच उपलब्ध होईल. मी २०२५ मध्ये लिहिलेला हा fb लेख आहे.)


HPV विरुद्ध लस मुलींसाठी देण्याची सुरुवात होईल अशी शक्यता दिसत आहे.
आणि आज एक लेख वाचत असताना त्यामध्ये याच्या उपयुक्ततेबाबत एक महत्त्वाची माहिती मिळाली. आणि तुम्हा सर्वांशी ती लगेच शेअर करावी वाटली.

जी लस आत्ता भारतात येणार आहे ती अमेरिकेमध्ये गेली दोन दशके दिली जात आहे. त्यामुळे अमेरिकेतील ज्या मुली आता वीस वर्षाहून अधिक वर्षाच्या आहेत त्यांना लहानपणी ही लस मिळालेली होती.

अशा 20 – 24 वयाच्या मुलींमध्ये कॅन्सर – पूर्व लक्षणे दिसतात का याची तपासणी करण्यात आली आणि काही वर्षांपूर्वीच्या आकड्यांपेक्षा आत्ताचे आकडे हे 80% कमी आहेत हे दिसून आले.

त्याहून मोठ्या स्त्रियांमध्ये हे आकडे 37% कमी झालेले दिसून आले. यांना लस मिळण्यापूर्वी त्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.

त्या लशीसारखीच चार विषाणू प्रकारांपासून सुरक्षा देणारी लस आता भारतामध्येही मिळणार आहे.

अमेरिकेमध्ये ही लस मुले व मुली दोघांनाही दिली जाते.
तिथे 26 वर्षांपर्यंत लस घेता येते.

जेव्हा ही लस इथे उपलब्ध होईल तेव्हा बारा वर्षाखालील मुलींना मिळू शकेल.
त्यावरील मुलींना तुम्ही आपल्या स्त्रीरोग तज्ञांशी चर्चा करून तीन डोस देऊ शकता.

याबाबत अनेक गैरसमज असल्याने योग्य माहिती घ्या.
डॉक्टर देखील जो सल्ला देतील त्याबद्दल काही रेफरन्स आहे का अशी माहिती घेऊ शकता.

लस सुरक्षित आहे . त्याने मुलींच्या प्रजनन क्षमतेवर कोणतेही परिणाम होणार नाहीत.  कारण ही लस गेली अनेक दशके इतर देशांमध्ये दिली जात आहे व त्याचे कोणतेही गंभीर परिणाम दिसून आलेले नाहीत.

– डॉ प्रिया प्रभू, मिरज
(१०/३/२५)

एका लेखातील भाग ज्यामध्ये एका अभ्यासाची माहिती दिली आहे

तुमचे प्रश्न कमेंटमध्ये लिहा , जेणेकरून त्यांची उत्तरे देता येतील.


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com