तुमचे तुमच्या आयुष्यातील स्त्रियांवर प्रेम आहे का ?

होय, आपल्या आयुष्यात एकाहून अधिक स्त्रिया असतात .

तुम्हीच मोजा ना ,
आई, बहीण, पत्नी, वहिनी, मुलगी, आज्जी, नात , सासू ..
लिस्ट अजून वाढू शकते. यातील सहसा एकाहून अधिक स्त्रिया आपल्या आयुष्यात असतात.
तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही स्वतःला देखील या लिस्ट मध्ये मोजायला हवे .

आज मी दोन कृतींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुमच्या जिवलग स्त्रियांच्या मृत्यूचा धोका कमी होईल.

माझ्या पोस्टच्या प्रत्येक वाचकाला माझी विनंती आहे की त्यांनी या दोन कृती नक्की कराव्यात .

सर्वात आधी , तुमच्या आयुष्यातील सर्व स्त्रियांची एक यादी बनवा !
त्यातील अविवाहित मुली एका गटामध्ये आणि ३० वर्षांहुन अधिक वयाच्या स्त्रिया दुसऱ्या गटामध्ये . (तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही कोणत्या गटात आहात ?

ही पोस्ट मख्यतः एका जीवघेण्या कर्करोगविषयी आहे.
बरोबर ओळखलंत , सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग. हा आजार लवकर लक्षात देखील येत नाही.

पण हा कर्करोग एका विषाणूच्या बाधेमुळे होतो . नाव आहे Human Papilloma Virus. याचे देखील उपप्रकार आहेत . या विषाणूंची बाधा सहसा तरुणपणामध्ये होते,मात्र कॅन्सर  विकसित होईपर्यंत  मध्ये बराच काळ जातो. याचा संसर्ग सहसा लैंगिक संबंधाद्वारे होतो.

खरे तर हा जानेवारी महिना या कर्करोगाबद्दल माहिती देण्यासाठी होता पण तेव्हा मी याविषयी काही लिहू शकले नाही.

तर माझी विनंती आहे सर्वांना ,
पुढील एका महिन्यामध्ये –

१. ३० वर्षांवरील सर्व स्त्रियांची PAP तपासणी करून घ्यायची आहे , जर PAP सह HPV विषाणू बाधा आहे का हेही तपासले जात असेल तर ती जोडचाचणी करून घ्या. यासाठी स्त्री रोग तज्ज्ञाकडे जावे लागेल.
ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर पुढची तपासणी पुन्हा ५ वर्षानंतर करायला हवी . आणि तपासणी मध्ये काही शंकास्पद बदल जाणवले तर त्यावर आपण लवकर उपाय करू शकू व कितीतरी त्रास व जीव वाचतील .
यामुळे ही तपासणी करणे ही एक कृती.

२. १५ वर्षावरील सर्व मुलींना HPV ची लस नक्की द्या , जर तो विषाणू संसर्ग झालाच नाही तर भविष्यात कर्करोग होण्याचा धोका खूप कमी होतो .
(लस ९ वर्षावरील मुलींना देता येते )
ही लस सध्या बाहेरून मागवावी लागते मात्र ती सुरक्षित आहे ,कारण इतर अनेक देशात वर्षानुवर्षे दिली जात आहे .
यासाठीही तुमचे स्त्री रोग तज्ञ तुमची मदत करू शकतील.

मी स्वतः देखील या दोन्ही कृती करणार आहे आणि माझा व माझ्या मुलीचा मृत्यूचा धोका , कर्करोगाचा धोका थोडा तरी कमी करणार आहे !

तुम्ही हे करणार असाल किंवा केले तर नक्की सांगा , इतरांना देखील त्यातून प्रोत्साहन मिळेल .

कर्करोगासारखे आजार टाळणे हे उपचारांपेक्षा कमी त्रासदायक असते .
फक्त दोन कृती तुमच्या प्रिय स्त्रियांना सुरक्षित ठेवतील.

(३१/०१/२०२३)
#प्रासंगिक_DrPriya 2

#HPV_Prevention_DrPriya 1

(ही पोस्ट मी जानेवारी 23 मध्ये लिहिली होती. त्यानंतर या सिरीज मध्ये अजून लेख लिहिले. आता भारतीय लस देखील उपलब्ध आहे. )


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com