दोन्ही स्तनांमधून थोडा थोडा वेळ पाजणे का चुकीचे आहे?

तुम्हाला पुढीलपैकी एखादा सल्ला कोणी दिला आहे का?

” बाळाला पाजताना प्रत्येक वेळी दोन्ही स्तनातून पाजायलाच हवे. पहिला स्तन मध्ये सोडवून दुसरा स्तन द्यायचा”

“बाळाला पाजताना थोडा वेळ उजवा स्तन आणि थोडावेळ डावा स्तन – असं दूध पाजायचं म्हणजे स्तन दाटत नाहीत. १० / १५ / २० मिनिटे झाली की स्तन बदलून पाजायचे .”

” दुधाच्या गाठी होऊ नयेत म्हणून दोन्ही स्तनांमधून काही मिनिटे पाजायचे ”

किंवा

“तुमचे दूध खूप जास्त प्रमाणात तयार होते आहे का?”

किंवा

“तुमचे बाळ जास्त किंवा सतत रडते” किंवा

“बाळ जास्त प्रमाणात दह्याची उलटी /ढेकर काढतेय” किंवा

“बाळाला संध्याकाळी वारंवार पोटदुखी (colic ) होते व ते किरकिरे होते” किंवा

“बाळाला गॅसेसचा त्रास होतोय ” किंवा

“बाळाला हिरवी फेसाळ व पातळसर शी होतेय जी एखाद्या संसर्गाशिवाय आहे” किंवा

अशी हिरवी शी होण्याची अनेक कारणे असू शकतात.

“बाळाला सतत डायपर रॅश/ शीच्या जागी लालसर पणा होतोय का?” किंवा

” बाळाला  भरपूर दूध पाजून देखील बाळाचे वजन वाढत नाहीये, विशेषतः बाळ ६ ते ८+ वेळा सुसु करतंय पण वजन मात्र हळूहळू वाढतंय ” किंवा

” बाळाच्या शी मध्ये थोडेसे रक्त दिसतेय” किंवा

” बाळ  सतत दूध प्यायला मागते आहे” किंवा ” – यातील एखादी तक्रार आहे?

यातील एकाही प्रश्नाचे उत्तर जर होय असेल तर तुम्ही ही पोस्ट नक्की वाचली पाहिजे.

कारण वरीलपैकी एखादा सल्ला तुम्ही ऐकला तर शक्य आहे की तुमच्या बाळाला नंतर उल्लेखलेल्या त्रासांपैकी एखादा त्रास जाणवू शकतो.

( वरील त्रासांची इतरही काही कारणे असू शकतात पण हा सल्ला ऐकणे हे पण एक कारण असू शकते हे लक्षात ठेवायला हवे)

तुम्हाला खूप जास्त स्तन्य (आईचे दुध) येत असेल किंवा तुम्ही स्तन रिकामे होईपर्यंत बाळाला पाजत नसाल तर शक्यता आहे की बाळाला Lactose overdose किंवा foremilk – hindmilk imbalance झालेले असू शकते.

हे त्रास होऊ नयेत किंवा दूर व्हावेत यासाठी काही गोष्टी करता येतील.

१. बाळ स्तनावर योग्य पकड (latch )घेत आहे याची खात्री करावी. (इथे वाचा)

२. बाळ व्यवस्थित स्तनपान करत आहे , milk transfer होत आहे याची खात्री करावी. (इथे वाचा)

३. बाळाला पाजताना  स्तन वारंवार बदलून पाजू नये. त्यामुळे foremilk म्हणजे सुरुवातीचे दूध जास्त प्रमाणात मिळते व बाळ ते व्यवस्थित पचवू शकत नाही .

याला foremilk/ hindmilk imbalance किंवा lactose overload असे म्हटले जाते . यामुळे वरीलपैकी एखादा त्रास बाळाला होऊ शकतो. पुढील(सुरुवातीचे ) दूध म्हणजे foremilk आणि मागील (नंतरचे) दूध म्हणजे hindmilk म्हणजे काय हे पुढील लेखात (इथे ) वाचूया.

४. प्रत्येक स्तन व्यवस्थित रिकामा होईल याची काळजी घ्यावी. यासाठी बाळाने स्वतःहून स्तन सोडल्यानंतर दुसरा स्तन द्यावा . Breast Compression या तंत्राचा वापर देखील करता येईल. याविषयी इथे वाचा.

बाळाला हवा तेवढा वेळ दोन्ही स्तनातून पाजत असाल (demand feeding) तर हे त्रास सहसा जाणवणार नाहीत.

याविषयी काही शंका असल्यास आपल्या डॉक्टरांशी किंवा स्तनपान तज्ज्ञांशी ( LC/ LP) चर्चा करू शकता.

– डॉ प्रिया प्रभू


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

One response to “दोन्ही स्तनांमधून थोडा थोडा वेळ पाजणे का चुकीचे आहे?”

  1. […] होऊ शकतो याविषयी पोस्ट लिहिली होती ती इथे वाचता […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com