स्तनपान प्रसार करणारे/प्रोत्साहन देणारे पुरुष

Written by:

स्तनपान हे जरी स्त्रियांचे काम समजले जाते तरी स्तनपानाच्या प्रसारासाठी प्रोत्साहनपर कार्य करणारे अनेक पुरुष डॉक्टर्स आहेत.
यातील काही जे मला भेटले किंवा ज्यांच्याविषयी मी माहिती ऐकली अश्यांबद्दल आज सांगणार आहे .
खरे तर स्तनपान सप्ताहामध्ये प्रत्येकावर एक पोस्ट लिहिणार होते पण ते न जमल्याने या पोस्टमध्ये त्यांचा संक्षिप्त उल्लेख तरी करेन.

१. डॉ प्रशांत गांगल सर
माझे स्वतःचे जेव्हा IYCF चे ट्रेनिंग झाले तेव्हा सर्वप्रथम मी कोणा पुरुष डॉक्टरांना स्तनपानाविषयी कळकळीने शिकवताना बघितले.
स्तनांवरील हातांची पकड कशी दाखवायची किंवा गोष्टी सहज सोप्या कश्या बनवायच्या ते त्यांच्याकडून शिकले.
सर BPNI maharashtra मध्ये सक्रिय सहभागी असून विविध ट्रेनिंग द्वारे स्तनपान विषयक कौशल्ये शिकवली जातात.
ब्रेस्ट crawl चा जो व्हिडीओ युनिसेफ ने बनवलाय त्यामध्येही सर आहेत.

२. डॉ. पराग दगली सर
हे मला BSIM या fb वरील सपोर्ट ग्रुप मध्ये भेटले (प्रत्यक्षात नव्हे) . मातांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना योग्य तो सल्ला देणे तसेच विविध मार्गांनी स्तनपानाचा प्रसार करणे हे खूप मनापासून करतात. गुजराती मध्ये विविध लेख देखील लिहिले आहेत. याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करतात.
ऑनलाईन सल्ले फ्रीमध्ये दिलेले असतात आणि असे माहिती सांगणारे डॉक्टर खूप कमी असतात.

३. डॉ योगेश साळे सर
हे पब्लिक हेल्थ मध्ये विविध पदांवर कार्य केलेले डॉक्टर आहेत आणि यांनी देखील स्तनपान प्रमोशन साठी विविध मार्गांनी योगदान दिले आहे .
हे स्वतः याबद्दल ट्रेनिंग घेतातच मात्र त्याच बरोबर हिरकणी कक्ष निर्मिती मध्ये यांचे योगदान आहे.
स्तनपान हा बालकांचा हक्क असल्याने याला चळवळ मानायला हवे असे यांचे म्हणणे आहे आणि यासाठी जन चळवळ देखील यांनी सुरू केली होती.

४. डॉ उमेश वैद्य सर
यांना मी अजून भेटलेली नाही मात्र गेल्या वर्षी पुण्यात काही LCs ना भेटले होते (या भेटीविषयी पोस्ट लिहिली होती) तेव्हा KEM पुणे येथील या सरांविषयी भरभरून ऐकले.
अपुऱ्या दिवसाच्या बाळांसाठी स्तनपान मिळावे यासाठी सर सर्वतोपरी प्रयत्न करतात.
तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही त्यांच्या कडून प्रेरणा मिळते आणि ते देखील स्तनपान प्रसारक बनतात.
असे अनेकांना प्रेरित करणारे सर, यांना कधीतरी नक्की भेटेन.

५. डॉ गोपाळ पांडगे सर
हे सर नुकतेच कोल्हापुरातील IYCF च्या ट्रेनिंग मध्ये माझ्यासोबत ट्रेनर होते.
सर त्यांच्या रिटायरमेंट नंतर देखील गेली १४ वर्षे स्तनपानविषयक विविध ट्रेनिंग द्वारे अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित आणि प्रोत्साहित करून स्तनपानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांचे अविरत योगदान देत आहेत.

६. डॉ अरुण गुप्ता सर
यांच्याविषयी एक रील आज बघितले , ज्यामध्ये IMS act १९९२ यांच्यामुळे झाला असा उल्लेख होता. यांची भेट झालेली नाही.
हे BPNI च्या संस्थापकातील एक आहेत .
IMS act मुळे विविध फॉर्म्युला कंपन्या आणि cerelac सारख्या कंपन्या त्यांच्या जाहिराती करू शकत नाही तसेच याचे प्रमोशन देखील करू शकत नाही. हा कायदा नसता तर जाहिरातींच्या माऱ्याने स्तनपानाचे प्रमाण खूप कमी झाले असते.

७. डॉ N. B. कुमटा सर
हे अतिशय सिनियर सर आहेत आणि BPNI सुरू करण्यामध्ये यांचे महत्वाचे योगदान आहे हे आत्ता वेबसाईट बघताना आढळून आले. १९९१ साली एका स्तनपान प्रशिक्षणानंतर प्रोत्साहित होऊन यांनी BPNI निर्मितीमध्ये पुढाकार घेतला!
यांनाही मी भेटलेले नाही मात्र सर BPNI चे foundar member असल्याने BPNI च्या विविध कामाबद्दल सर्वांना अभिमानच वाटतो.
(एकूण ७ डॉक्टरांची माहिती लिहिणार होते म्हणून सरांविषयी वाचले , यांचे कार्य नक्कीच खूप मोठे आहे)

पण एक आंतरराष्ट्रीय स्तनपान तज्ञ मी विसरलेच होते.

८. डॉ जॅक न्यूमन सर
यांना प्रत्यक्ष नसले तरी झूम मिटिंग मधून बोलले आहे.
हे कॅनडातील सुप्रसिद्ध डॉक्टर असून यांचे स्तनपान विषयक प्रसिद्ध हॉस्पिटल आहे. यांचे अनेक माहितीपर लेख आणि पुस्तके आहेत. यांचे व्हिडीओ देखील आहेत ज्यामध्ये अडचणी कश्या सोडवायच्या याबद्दल माहिती आहे. हे आंतरराष्ट्रीय तज्ञ आहेत. स्तनपानाविषयी कधी काही प्रश्न पडला एखाद्या डॉक्टरांना तर यांच्या वेबसाईटवर नक्की शास्त्रीय उत्तर सापडते.

केवळ स्तनपानच नव्हे तर बाळाच्या आरोग्यासाठी विविध प्रकारे कार्य करणारे डॉ जोशी दाम्पत्य देखील सर्वांना माहिती हवे!

९. डॉ हेमंत जोशी सर
या सरांनी न केवळ स्तनपानाचा प्रसार केला तर प्रत्येक नोकरदार आईला पाहिले ६ महिने निव्वळ स्तनपान देणे शक्य व्हावे यासाठी ६ महिन्याची प्रसूती रजा मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न देखील केले व त्यामुळे तसा कायदा झाला.
अनेक आई व बाळांसाठी हा प्रसुतीरजा कायदा सहाय्यकारी ठरला आहे.
याखेरीज मुलांमध्ये कुपोषण होऊ नये यासाठीही अनेक उपाय जसे “अक्षयपात्र” “3 plank protein bridge” सरांनी सुचवले आहेत. वैद्यकीय माहिती मराठी व इतर भाषांमध्ये उपलब्ध व्हावी यासाठी सरांनी वेबसाईट आणि आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंकाद्वारे प्रयत्न केले आहेत .
ओर्कुटवर असताना मी मराठीमध्ये लिहिणे सुरू केले तेव्हा सरांचे सातत्यपूर्ण काम माझ्यासाठी प्रेरणादायी होते.

स्तनपान प्रसार करणे हे प्रत्येक डॉक्टरांचे कर्तव्य आहेच मात्र हे काम मनापासून आणि झोकून देऊन करणारे हे असे अनेक पुरुष डॉक्टर्स देखील आहेत जे प्रत्येक बाळाला त्याचा स्तनपानाचा हक्क मिळावा यासाठी मनापासून झटतात.

तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष ,स्तनपान प्रसार / प्रोत्साहन तुम्ही नक्कीच करू शकता !
चला सर्वजण मिळून स्तनपान वाढावे यासाठी आपले योगदान देऊया !

  • डॉ प्रिया प्रभू, मिरज
    (३१/८/२४)

Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.