बाळाने दूध पिल्यानंतर बाळाला ढेकर काढणे ही एक महत्त्वाची कृती असते . दूध पिताना बऱ्याच वेळा बाळाच्या पोटात हवा ही जाते आणि ती हवा ढेकर देऊन काढली की त्यांनी बाळाचे पोट दुखण्याचे प्रमाण आणि रडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
पण बाळांची ढेकर विशेषतः अगदी लहान बाळांची ढेकर काढणे हे थोडेसे किचकट काम वाटू शकते. कारण त्यांना आपल्या खांद्याशी उभे धरणे सगळ्यांनाच सहजपणे जमते असे नाही.
त्यामुळे आज ही एक सोपी युक्ती तुमच्या सोबत शेअर करत आहे. या एकाच युक्तीसाठी दोन रील मला सापडल्या. त्यांच्या लिंक सोबत देत आहे .
याच्यामध्ये बाळाला मांडीवर थोडेसे उभे धरून फक्त त्यांची पाठ सरळ केली म्हणजे लहान बाळे पाठीला बाक देऊन बसतात त्याऐवजी थोडीशी सरळ पाठ केली की त्यांची ढेकर निघते असे दिसून येते .
तुम्ही ही आयडिया नक्की वापरून बघा आणि त्याचा तुम्हाला फायदा होतोय का हेही कमेंट मध्ये सांगा. जेणेकरून इतरांना समजेल की ही युक्ती खरंच काम करते की नाही.
पुढील लिंक्स त्या रीलच्या आहेत.
https://www.facebook.com/share/r/69mMFbqdDEHq6YP4/?mibextid=0VwfS7
आणि
https://www.facebook.com/share/r/fUEAd5m4X9ErMj5F/?mibextid=0VwfS7
डॉ प्रिया प्रभू



Leave a Reply