सर्व लहान मुले रडतात तेव्हा त्यांच्या पोटात गॅसेस झालेले असू शकतात . सहसा संध्याकाळच्या वेळी रडणारी मुले ही पोटातील गॅसेस मुळे पोट दुखू लागल्याने रडत असतात. त्यांना शांत करणे अतिशय अवघड जाते.
अशावेळी करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि उपयुक्त असा उपाय आहे त्याचं नाव आहे ‘बेबी इन द ट्री होल्ड’ ( Baby in the tree hold)

पोटात हवेचा गुबारा धरल्यामुळे मुले अस्वस्थ झालेली असतात आणि अशावेळी त्यांना टम्मी टाईम म्हणजे पोटावर पालथे झोपवणे यामुळे आराम मिळू शकतो.
बऱ्याच वेळा लहान मुलांना पोटावर पालथे झोपवणे सहज शक्य होत नाही किंवा रडणारी मुले गादीवर एकटी झोपायला तयार होत नाहीत म्हणून आपल्या हातावर त्यांना पालथे ठेवून जवळ धरले की बाळे रडणे बंद करून शांत होऊ शकतात.
हा बेबी इन द ट्री होल्ड वरील चित्रप्रमाणे दोन हात वापरून करता येतो किंवा लहान बाळ असेल तर एका हातावर देखील बाळांना तसे धरता येते.

बाळांच्या पोटात गॅसेस होऊ नयेत किंवा कमीत कमी व्हावेत यासाठीही काही उपाय करता येतात त्याविषयी लिहिनच.
बाळांना असे पालथे धरण्यासाठी कसे उचलावे याविषयी काही रिल्स ची लिंक सोबत देत आहे ते अवश्य पहा. विशेषतः अगदी लहान बाळांना उचलताना कशी काळजी घेता येईल ते यामध्ये सांगितले आहे.
बाळाला कसे धरावे ( Baby in the tree / Tiger on the branch hold)
लहान बाळाला गादीवरून हातावर कसे घ्यावे
अजून कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचणे आवडेल तेही कमेंट मध्ये सांगा. नवी पोस्ट समजण्यासाठी ब्लॉगला फॉलो किंवा सबस्क्राईब करा.
– डॉ प्रिया प्रभू , मिरज.



Leave a Reply