स्तनपान विषयक सर्वोत्तम सल्ला (भाग २)

Written by:

मागील पोस्टमध्ये आपण एका फेसबुक पेजवर वाचकांनी लिहिलेले ५ सर्वोत्तम सल्ले वाचले. या पोस्टमध्ये पुढील सल्ले बघूया.

6. Learn side lying feeding .

साईड लायिंग फीडिंग म्हणजे झोपून पाजणे.  झोपून पाजण्याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत . मात्र ही पद्धत सुरक्षित आहे.  या पद्धतीने जेव्हा आई बाळाला पाजते त्यावेळी रात्रीच्या वेळी पाजणे किंवा अधिक काळापर्यंत पाजणे शक्य होते.  कारण असे पाजल्याने आईलाही पुरेशी विश्रांती मिळते आणि त्यामुळे दुधाचे प्रमाण देखील वाढते. झोपून पाजताना सुरक्षितपणे कसे पाजायचे याबद्दल मी लवकरच लिहीन

7. Give lots of skin to skin and don’t  force it. Babies are super clever and know.

नवजात म्हणजे नुकतीच जन्मलेली बाळेपण स्वतःहून स्तनपान सुरू करण्याची क्षमता असणारी असतात. याविषयीची पोस्ट वाचली असेलच.  अनावृत्त स्पर्श म्हणजे स्किन टू स्किन म्हणजे कपड्यांशिवाय बाळाला आईच्या छातीजवळ ठेवणे . यामुळे स्तनपानात जाणवणाऱ्या बऱ्याच अडचणी ह्या दूर होण्यास मदत होते . कारण आपली त्वचा आपले सर्वात मोठे ज्ञानेद्रिय आहे आणि स्पर्श झाल्याने बाळांमधले नैसर्गिक रिफ्लेक्सेस जागृत होतात आणि बाळे देखील स्तनपान घेण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करतात.

त्यामुळे स्तनपानात अडचणी येत असतील तर स्किन टू स्किन करणे म्हणजे अनावृत्त स्पर्श बाळासाठी देणे आणि बाळासोबत बराच वेळ एकत्र राहणे याने अडचणी दूर होऊ शकतात.

8. Try to relax while feeding as much as possible . Milk flows better when the shoulders are down and mom is comfortable.

आईने तणाव विरहित असणे आणि आरामशीरपणे बसणे याचे महत्त्व म्हणावे तितके लक्षात येत नाही.  दूध स्तनातून बाहेर येण्यासाठी जो रिफ्लेक्स असतो त्यासाठी आई शांत व प्रसन्न असणे हे खूप आवश्यक आहे.

त्यामुळे आपण बाळाला दूध पाजत असताना आपल्याला स्ट्रेस जाणवत नाही ना याबाबत नेहमीच काळजी घ्यायला हवी .

तणाव ओळखण्याची अगदी साधी खूण म्हणजे सहसा आपले खांदे आपण घट्ट आकसून घेतलेले असतात.  जाणीवपूर्वक खांदे सैल सोडणे, शरीरातील सर्व स्नायूंना  सैल सोडणे , पाठीला व्यवस्थित आधार मिळेल अशा पद्धतीने बसणे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत . आईला रिलॅक्स वाटावे यासाठी प्रयत्न केल्यास बाळाला मिळणाऱ्या दुधाचे प्रमाणही वाढते.

9. When expressing milk , cover it and don’t watch it.

कोणत्याही कारणाने आई जेव्हा स्तनातून दूध काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळी निघालेले दूध पाहून तिच्या मनात हमखास शंका येते की माझे दूध कमी आहे का ! अर्थात जेव्हा हाताने किंवा पंपाने दूध काढले जाते तेव्हा मिळणारे दूध हे बाळाने प्रत्यक्ष स्तनाग्रे चोखल्यानंतर बाळाला मिळणाऱ्या दुधापेक्षा अर्थातच कमी असते.  

जेव्हा आई स्तनातून दूध काढत असते त्या वेळी किती दूध येतंय , दूध येतंय की नाही असे विचार मनात येऊ नये आणि त्यामुळे आईचा ताण वाढू नये यासाठी , ती जर पंप करत असेल तर त्या बाटल्यांकडे लक्ष न देता त्यांना थोडे झाकून इतर कामांमध्ये मन गुंतवले की मग आई निवांत असल्याने पंप द्वारे मिळणाऱ्या दुधाचे प्रमाणही वाढू शकते.

काढलेले दूध हे स्तनाच्या दूध निर्मिती क्षमतेचे मोजमाप नसते .

10. Trust your baby and follow their lead.

बाळाला पाजण्यासाठी आपण डिमांड फीडिंग देतो.  डिमांड फीडिंग म्हणजे बाळाला हवं तेवढं स्तनपान आपण देणार आहोत.

पण कधी कधी बाळे वारंवार प्यायला मागतात,  पुन्हा लगेच प्यायला मागतात,  सलग प्यायला मागतात (cluster  feeding) आणि अशावेळी मग दूध पुरते की नाही अशी शंका आई घेते. 

लगेच अशी शंका घेण्याऐवजी बाळाला दूध पुरतंय याची लक्षणे तपासणे आणि त्यानंतर बाळाला हवे तेवढे आणि हव्या तेवढ्या वेळी पाजणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. 

बाळ त्याच्या गरजेनुसार दूध मागत असते आणि बाळावर विश्वास ठेवून आपण जेव्हा बाळाला हवे तेवढे दूध पाजतो तेव्हा बाळाची वाढ चांगली होते. मात्र बाळाला दूध पाजताना मिल्क ट्रान्सफर होतंय याचीही योग्य खात्री करायला हवी.

आजच्या पोस्टमध्ये आपण पुढील पाच सर्वोत्तम सल्ले कोणते हे बघितले. (एकूण १० सल्ले)

यानंतरच्या पोस्टमध्येही अजून काही छान सल्ले मी सांगेन.  नव्या पोस्ट मिस होऊ नये म्हणून ब्लॉग सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक नव्या पोस्टची लिंक तुमच्या मेल मध्ये पोहोचेल

डॉ. प्रिया प्रभू. मिरज.


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.