थोडी वाट बघाल का ?

Published on

in

काही वैयक्तिक वैद्यकीय कारणामुळे स्तनपानाविषयी पुढील लेख मी रोज लिहू शकत नाहीये . पण लवकरच मला जमेल तसे पुढील लेख लिहीन. अजून खूप मोठे आहे स्तनपानाचे जग ! मला सांगायचा उत्साह आणि तुम्हाला वाचायचा उत्साह आहे हे छान आहे!

फेसबुकवरून ब्लॉग वर येणाऱ्या वाचकांना या माझ्या अडचणीची कल्पना आहेच , मात्र ब्लॉग चे 4-5 वाचक गुगल सर्च मधून ब्लॉग पर्यंत पोचले होते , अश्या वाचकांना अचानक ब्लॉग शांत का झालाय हे लक्षात येणार नाही म्हणून ही पोस्ट इथे लिहून ठेवत आहे !

नव्या पोस्ट मिस होऊ नयेत असे वाटत असेल तर हा ब्लॉग किंवा एखादी आवडलेली पोस्ट लाईक करा . बहुदा वर्डप्रेस अकाउंट असणे आवश्यक असेल ( नक्की माहीत नाही) पण त्यानंतर प्रत्येक नव्या पोस्टची माहिती तुमच्या इमेल इनबॉक्स मध्ये लगेच पोचेल.

ही साईट सध्या स्तनपान या विषयी माहिती देणारी असली तरी लवकरच मी फेसबुक वर जे विविध विषयांविषयी लिहिते त्यातील काही विषयांच्या लेख समुहाबाबत माहिती याच साईट वर असेल. विषय कोणकोणते हे जाणून घ्यायचे असेल तर पुढील लिंक पोस्ट बघा !

वरील पैकी कोणत्या विषयांचे लेख एकत्रित आवडतील ते अवश्य सांगा.

मी सहसा आरोग्यपूर्ण जगण्यासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व बाबींवर माहितीपूर्ण लेख लिहिते. स्तनपान विषयक पोस्ट आवडत असतील तर इतर विषयांचे लेख देखील अवश्य वाचून बघा आणि तुम्ही सजेस्ट करा , काय काय विषय वाचायचे आहे ते !

सर्वात महत्वाचे म्हणजे साईटच्या नावानुसार तुम्हाला आरोग्यविषयक काहीही प्रश्न किंवा शंका असतील तर मला विचारा म्हणजे मी त्याविषयी अवश्य शास्त्रीय माहिती देईन! पक्का वादा! Just ask Dr Priya !

(आणि हो, गुगल सर्च मध्ये मला हा ब्लॉग नाही सापडला (अजून नवा आहे ना!) त्यामुळे तुम्ही कसा शोधला हे मला नक्की सांगा बरं का! )

डॉ प्रिया प्रभू

drprdeshpande2@gmail.com


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com