चीक दूध जीव वाचवू शकते?

मला कालच समजले हे ! गेली २० वर्षे मी स्तनपानाविषयी माहिती मिळवत आहे पण तरीही जेव्हा असे काही अचानक समजते तेव्हा या आईच्या दुधाबद्दल प्रेम व आदर पुन्हा पुन्हा वाढतो! किती अद्भुत आहे स्तनपान विश्व आणि विशाल देखील!

तुम्हालाही जाणून घ्यायचीय ना ही माहिती?

विज्ञानाच्या प्रगतीमुळे अपुऱ्या दिवसाची व अगदी १००० ग्रॅम हुन कमी वजनाची बाळे देखील वाचवणे शक्य आहे! त्यासाठी NICU मध्ये पूर्ण टीम काम करत असते. बऱ्याच पालकांना preterm baby care घ्यावी लागते आणि हा खरंच खूप कठीण काळ असतो.

या अतिशय कमी वजनाच्या बाळांना स्तनपान देणे शक्य नसते ,मात्र जशी जशी त्यांची वाढ होईल त्यानुसार त्यांना तोंडी आहार देण्याची सुरुवात केली जाते. जी बाळे फार लवकर जन्मल्यामुळे त्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती देखील पुरेशी वाढलेली नसते आणि त्यांना sepsis सारख्या धोक्याला सामोरे जावे लागते. हे संसर्ग पोटाचे किंवा व्हेंटिलेटर मुळे होणारे असू शकतात व बाळाच्या मृत्यूचे कारण ठरू शकतात.

अश्या या नाजूक बाळांसाठी आईचे चीक दूध जे पहिल्या ३ दिवसांपर्यंत येते ते जीवनदायी ठरू शकते! याला विविध नावे आहेत . Oral colostrum therapy , Oral colostrum application , Oral immune therapy , Oral therapy with OMM etc

यामध्ये ०.५ ते १ मिली एवढेच चीक दूध बाळाच्या तोंडामध्ये कापसाच्या बोळ्याने (swab) किंवा सिरिन्जने लावले जाते! अगदी पहिल्या दिवसापासून तर बाळ आईचे दूध तोंडावाटे पिऊ लागेपर्यंत हा उपाय केला जातो.

या चीक दुधाच्या उपचारामुळे बाळाचे विविध जंतुसंसर्गापासून संरक्षण होते . बाळाची इम्युनिटी बळकट होते . बाळ लवकर डिस्चार्ज करता येते कारण गुंतागुंत न झाल्याने व लवकर तोंडी आहार सुरू झाल्याने दवाखान्याची गरज कमी होते! आईचे दूध व्यवस्थिती सुरू झाल्याने आईला भविष्यात स्तनपान करणे सोपे जाते!

चीक दूध उपचार करायचे असतील तर आईने लवकरात लवकर स्तनांमधून दूध काढणे आवश्यक आहे! हे हाताने किंवा पंपद्वारे करता येते. दूध काढण्याचे तंत्र प्रत्येक गरोदर मातेला माहीत असणे अत्यावश्यक आहे ! याविषयी माहिती देखील लवकरच देईन! 👍

या विषयावरील हा एक शास्त्रीय अभ्यास (Meta analysis) आहे . लिंक – https://www.frontiersin.org/articles/10.3389/fped.2022.895375/full

तसेच याविषयी थोडक्यात माहिती देणारा लेख इथे वाचता येईल!

चीक दुधाला golden milk म्हणतात आणि जन्मानंतर एका तासाच्या आत बाळाला स्तनपान सुरू करून हे चीक दूध नक्की मिळेल यासाठी आपण सर्वांनी शक्य ते सर्व प्रयत्न आई गरोदर असल्यापासूनच करायला हवेत! आपण सर्वांनी म्हणजे कुटुंबीय व आरोग्य कर्मचारी यांच्यासह समाज म्हणून आपण देखील! योग्य माहिती सर्वांना असेल तर नव-मातेला चुकीचे सल्ले मिळण्याची शक्यता कमी होते तसेच स्तनपान देणाऱ्या मातेला आदर व प्रेम मिळू शकते!

मी माहिती देईन, तुम्ही समजून घ्या, प्रश्न विचारा आणि इतरांना देखील सांगा! ( बोनस फायदा – स्तनपान पर्यावरण पूरक देखील आहे ! कसे ते सांगेन लवकरच!) माणसाच्या बाळासाठी बनलेले जीवरक्षक आईचे दूध प्रत्येक बाळाला मिळेल यासाठी आपण सर्व नक्की प्रयत्न करूया, काय म्हणताय ?

  • डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)
  • (१५/०९/२०२३)
  • drprdeshpande2@gmail.com


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com