निप्पल नव्या लिपस्टिक सारखे तिरके दिसतात का ?

स्तनपान देणाऱ्या प्रत्येक आईने लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे , बाळ स्तनपान करताना जर काही दुखत असेल तर बाळाची स्तनावरील पकड चुकली आहे .

बऱ्याच वेळा स्तनदा मातांना सांगितले जाते की “सुरुवातीला थोडे दुखेलच, हळूहळू सवय झाली की होईल कमी.” पण हा चुकीचा सल्ला आहे ! स्तनपान कधीही वेदनादायी नसते . प्रत्येक वेदना का झाली याचे कारण शोधून ते दूर केल्यास स्तनपानसंबंधी तक्रारी निर्माण होत नाहीत .

बाळाची पकड स्तनावर असावी, निप्पल किंवा स्तनाग्रावर नाही. याला Deep Latch म्हणतात . जर पकड योग्य नसेल तर milk transfar होऊ शकत नाही. मग बाळ जास्त वेळ स्तन चोखते . तसेच स्तनाग्र टाळू व जिभेमध्ये आल्याने हुळहुळे होते व त्याला चिरा पडून स्तनपान देताना असह्य वेदना होतात.

एक महत्वाची खूण म्हणजे स्तनपान झाल्यानंतर स्तनाग्राचा आकार गोल न दिसता नव्या लिपस्टिक सारखा तिरका दिसतो. याचा अर्थ निप्पल बाळाच्या तोंडामध्ये चेपले जातेय व लवकरच त्याला भेगा पडू शकतात किंवा जखम होऊ शकते .

याचे कारण वर सांगितल्या नुसार shallow latch म्हणजे स्तनावरील उथळ पकड. बाळाला स्तन देताना जर बाळाने तोंड व्यवस्थित उघडले नसेल तर अशी पकड होऊ शकते . अश्यावेळी स्तनाग्र टाळू व जिभेमध्ये अडकून मग पुढील प्रॉब्लेम्स सुरू होतात.

योग्य पकड कशी घेता येईल हे पुढील पोस्ट मध्ये बघूया . ब्लॉग ला subscribe केले की प्रत्येक पोस्ट mail मध्ये पोचेल व तुमच्याकडेही सेव्ह होईल!

प्रत्येक नव्या आईने बाळाला पाजल्यानंतर स्तनाग्र तपासून ते नव्या लिपस्टिक सारखे दिसत नाही ना यावर लक्ष ठेवायला हवे. आणि दिसत असेल तर deep latch करण्याचा प्रयत्न करावा !

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

drprdeshlande2@gmail.com


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

3 responses to “निप्पल नव्या लिपस्टिक सारखे तिरके दिसतात का ?”

  1. […] स्तनांची देखील झालेली असते हे मी लिपस्टिक सारखी स्तनाग्रे च्या पोस्ट मध्ये सांगितले होते, […]

  2. Anand avatar
    Anand

    Valuables information

    1. drprdeshpande avatar

      धन्यवाद ! 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com