जसा शरीराला एखादी जखम झाली की रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आपण तातडीने ‘फर्स्ट-एड’ (प्राथमिक उपचार) करतो, अगदी तसंच जेव्हा एखादी व्यक्ती तीव्र मानसिक ताणातून किंवा अॅन्झायटी अॅटॅक (Anxiety Attack) मधून जात असते, तेव्हा तिच्या मनाला स्थिर करण्यासाठी ‘सायकॉलॉजिकल फर्स्ट-एड‘ ची गरज असते.
घराच्या घरी आपल्या माणसाला हा भावनिक आधार कसा द्यावा, याच्या ५ अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
१. फक्त शांतपणे ऐकून घ्या (Active Listening)
मानसिक ताणात असलेल्या व्यक्तीला अनेकदा उपायांची नाही, तर फक्त कोणीतरी त्यांचं ऐकून घेण्याची गरज असते.
पण आपली सवय असते की कोणी काही सांगितले की त्याला समजवायला हवे. मग आपण लगेच काहीतरी उपाय सांगायला सुरू करतो, सल्ला देतो.
घराच्या घरी आपल्या माणसाला हा भावनिक आधार कसा द्यावा, याच्या ५ अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत:
१. फक्त शांतपणे ऐकून घ्या (Active Listening)
मानसिक ताणात असलेल्या व्यक्तीला अनेकदा उपायांची नाही, तर फक्त कोणीतरी त्यांचं ऐकून घेण्याची गरज असते.
पण आपली सवय असते की कोणी काही सांगितले की त्याला समजवायला हवे. मग आपण लगेच काहीतरी उपाय सांगायला सुरू करतो, सल्ला देतो. पण त्यामुळे मग त्या व्यक्तीला बोलून मोकळे होण्याची संधी मिळत नाही.
काय करावे?:
त्यांचे बोलणे मध्येच तोडू नका. “असं कसं होऊ शकतं?” किंवा “तू चुकीचा विचार करतोयस” असे युक्तिवाद करू नका. तुमच्या शरीराची भाषा (Body Language) सकारात्मक ठेवा. त्यांच्या जवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि त्यांना पूर्ण बोलू द्या. तुम्ही ऐकत आहात हे त्यांना जाणवून द्या.
२. त्यांच्या भावनांना मान्यता द्या (Validate Their Feelings)
ही खूप महत्वाची पायरी आहे मात्र ही आपण कधीच करत नाही.
त्यांच्या त्रासाला कधीही ‘किरकोळ’ समजू नका.
काय म्हणू नये?:
“यात काय एवढं मोठं?”, “लोकांवर याहून मोठी संकटं येतात”, “तू विनाकारण विचार करतोयस.” “थोडा पॉझिटिव्ह विचार कर, विसरून जा.” “थोडे समजून घे समोरच्याची बाजू”.
काय म्हणावे?:
“मी समजू शकतो/शकते की आत्ता तुझ्यासाठी हा काळ खूप कठीण आहे.” किंवा “तुला आत्ता जी भीती वाटतेय, ती अगदी साहजिक आहे.”
नेमकी भावना ओळखा आणि तिला मान्यता द्या की “शक्य आहे, असे वाटू शकते. असे वाटणे स्वाभाविक आहे.”
जेव्हा आपण त्यांच्या दुःखाला मान्यता देतो, तेव्हा त्यांचा अर्धा ताण तिथेच कमी होतो.
३. खोटा धीर किंवा फुकटचे सल्ले टाळा (Avoid Toxic Positivity)
“सगळं ठीक होईल” किंवा “पॉझिटिव्ह विचार कर” हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण नैराश्यात असलेल्या व्यक्तीला या शब्दांमुळे आपण अपयशी असल्यासारखे वाटते.
असे म्हणू शकता:
सल्ले देण्याऐवजी त्यांना विश्वासाची कृती दाखवा. त्यांना सांगा— “परिस्थिती आत्ता कठीण आहे आणि सगळं कधी ठीक होईल हे मलाही माहीत नाही, पण या कठीण काळात मी खंबीरपणे तुझ्यासोबत उभा/उभी आहे.”
“आपण मार्ग काढू”
४. ‘ग्राउंडिंग’ करायला मदत करा (Grounding Techniques for Panic)
जर समोरची व्यक्ती तीव्र अस्वस्थतेमुळे थरथरत असेल, रडत असेल किंवा तिचा श्वास फुलत असेल, तर तिला वर्तमानात आणण्यासाठी ‘ग्राउंडिंग’ करा:
पाणी द्या: त्यांना एक ग्लास थंड पाणी हळूहळू घोट-घोट प्यायला सांगा. किंवा थंड पाण्याने चेहरा धुवायला सांगा.
श्वासावर लक्ष- सखोल श्वास:
त्यांच्यासोबत स्वतः दीर्घ श्वास घ्या. ४ सेकंद श्वास आत घेणे, ४ सेकंद रोखून धरणे आणि ४ सेकंदात बाहेर सोडणे, पुन्हा ४ सेकंद रोखून ठेवणे (Box Breathing) याने मेंदू शांत होतो.
५-४-३-२-१ पद्धत:
त्यांना खोलीतील अशा ५ गोष्टी पाहायला सांगा ज्या ते पाहू शकतात, ४ गोष्टी ज्यांना स्पर्श करू शकतात, ३ गोष्टी ज्या ऐकू शकतात, २ गोष्टी ज्यांचा वास घेऊ शकतात आणि १ गोष्ट ज्याची चव घेऊ शकतात. यामुळे विचलित झालेला मेंदू शांत होतो.
५. शारीरिक गरजांची काळजी घ्या (Check Basic Needs)
तीव्र मानसिक ताणात माणूस जेवण, पाणी आणि झोप विसरून जातो. शरीराच्या गरजा पूर्ण झाल्या की मनाला थोडी उभारी मिळते.
काय करावे?:
त्यांना आंघोळ करायला किंवा चेहरा धुवायला सांगा. त्यांना आवडेल असा हलका आहार किंवा चहा-कॉफी द्या. खोलीमध्ये मंद प्रकाश ठेवा आणि त्यांना विश्रांती घेण्यास प्रवृत्त करा.
तीव्र तणाव किंवा anxiety attacks अनेक कारणाने येऊ शकतात. तर कोणामध्येही आणि कोणत्याही वयात येऊ शकतात. स्वतःमध्ये किंवा आपल्या प्रिय व्यक्तीमध्ये येऊ शकतात . अश्यावेळी नेमके काय करावे सर्वांना माहित हवे.
भावनिक फर्स्ट-एड हे तात्पुरते मन शांत करण्यासाठी असते. जर हा ताण अनेक दिवस सलग टिकून राहत असेल, तर तातडीने व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यांच्या ताणाच्या क्षणांमध्ये तुमची योग्य प्रतिक्रिया ठरवेल की ताण कमी होईल की वाढेल !
म्हणून त्यांना मदत करण्यासाठी तुमचे स्वतःचे skills वाढवा!
— डॉ. प्रिया प्रभू, मिरज
(१७/७/२०२६)
आधीच्या पोस्ट नक्की वाचा!!


Leave a Reply