डिमेंशिया रुग्ण हरवणे – dementia wandering

Published on

in

, ,


डिमेन्शियाचा रुग्ण घराबाहेर पडून भटकणे/ हरवणे ही घटना कधीही व कोणाही सोबत घडू शकते .
डिमेंशिया रुग्ण चालता फिरता असेल तर असे घडण्याची शक्यता वाढते . अशी घटना डिमेंशियाच्या सुरुवातीच्या पायऱ्यांवर देखील घडू शकते .

रुग्ण नकळत घराबाहेर पडत असल्याने किंवा बऱ्याचदा स्वभाव हट्टी बनल्यामुळे देखील त्यांच्या अंगावर काही ओळखीची खूण , वस्तू, GPS ट्रॅकर , मोबाईल असेलच असे आपण सांगू शकत नाही .

सोबत काही माहितीपूर्ण लिंक्स देत आहे , त्यानुसार हे टाळण्यासाठी काय करता येऊ शकेल हे समजून घेता येईल.
सोबतचे फोटोज देखील महत्वाची माहिती देणारे आहेत .

अश्या घटना का घडतात ?


डिमेंशिया रुग्णाला स्वतःला विस्मरण आहे याची कल्पना नसते त्यामुळे त्यानुसार ते स्वतःचे वागणे बदलू शकत नाहीत .
काळजीवाहकाने सांगितलेल्या सूचना देखील ते पाळू शकत नाहीत .


डिमेंशिया रुग्ण स्वतःच्या एका वेगळ्या विश्वात जगत असतात. Altered reality म्हणजे त्यांच्या मनात ते तरुण व नोकरदार असू शकतात किंवा शाळेत जाणारे लहान मूल , अर्थात हे डिमेंशियाच्या पुढील पायऱ्यांवर घडते . त्यामुळे ते त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करत असतात .


किंवा नियमित कामासाठी बाहेर पडणारे उदा. फिरायला जाणारे कधी अचानक घराचा रस्ता विसरून भटकू शकतात .


कधी त्यांना स्वतःच्या कल्पनेतील घरी जायचे असू शकते.


कधी त्यांना काही त्रास जाणवत असतो (उदा. अत्याधिक आवाज)  व ती जागा सोडून दूर जायचे असते .


नवीन ठिकाणी गेले असल्यास किंवा गर्दीच्या ठिकाणी ते गोंधळून जाऊन हरवू शकतात.


अश्या कोणत्याही कारणामुळे किंवा कारणाशिवाय देखील डिमेंशिया रुग्ण घर सोडून बाहेर पडतात व त्यानंतर परिस्थितीनुसार कुठेही पोचू शकतात .

याचा धोका काय ?


अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की हरवलेल्या साधारण ५०%  रुग्णांना काहीतरी इजा होते , जी साधी किंवा गंभीर असू शकते .
इतर आजार असतील तर त्यामुळे गुंतागुंत होऊ शकते .
तसेच रस्ते , वाहने , ऊन , थंडी , पाऊस इत्यादी मुळे जसा जसा काळ उलटेल तशी जगण्याची शक्यता कमी होत राहाते . रुग्ण हरवून घराबाहेर पडल्यानंतर २४ तासांमध्ये जगण्याची शक्यता ३३% होते , त्यामुळे तातडीने हालचाली करणे आवश्यक असते .

त्यामुळे रुग्ण भटकण्याचा धोका शक्य तेवढा कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत . (शेवटी दिलेले लिंक्स / फोटो पहा )

रुग्ण हरवला आहे हे लक्षात आल्यावर काय करावे ?

१. लक्षात आल्यावर तातडीने शोधमोहीम सुरू करावी
२. त्यांची नेहमीची ठिकाणे तसेच ते जाऊ न शकणारी ठिकाणे देखील तपासून पहावीत .
३. या काळात रुग्ण सहसा 2-3 किमी परिसरामध्ये सापडतात असा अनुभव असल्याने हा भाग तपासावा
४. त्यापूर्वी रुग्ण कुठे जाण्याबाबत बोलत असेल उदा. नोकरीचे ठिकाण , नातेवाईक इ. तर त्या मार्गावर तपास करावा .
५. आडोश्याची ठिकाणे पहावीत .
६. अमेरिकेमध्ये केवळ १५ मिनिटे शोध घेतल्यानंतर पोलिसांना कल्पना द्यावी असे निर्देश आहेत . भारतात अजून अशी सिस्टीम विकसित झालेली नाही पण आवश्यकता आहे . पोलिसांची मदत सहसा लवकर घ्यावी.
६. वेळ उलटेल तसे रुग्ण घरापासून अधिकाधिक दूर जाऊ शकतात त्यामुळे शोध घेण्याचा परिसर वाढवावा .
७. सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करावा.
८. दुखपतीची शक्यता असलेने दवाखान्यांमध्येही चौकशी करावी .
९. अशी घटना पूर्वी घडली असल्यास जिथे सापडले तो परिसर देखील तपासावा .
१०. असे दिसून आले आहे की भटकताना रुग्ण ते डावरे आहेत की उजवे (हातांचा वापर ) त्यानुसार वळणे घेत पुढे जाऊ शकतात त्यामुळे प्रथम त्या बाजूचा परिसर तपासता येईल.

याखेरीज अश्या प्रसंगाची पूर्व तयारी म्हणून काही गोष्टी करता येतील.
१. स्पष्ट व समोरून काढलेले असे रुग्णाचे फोटो नियमित पणे काढावेत , कारण वय झाल्यावर झपाट्याने बदल होत असतात . शोध घेताना सर्वांना देण्यासाठी कामी येतील.
२. CCTV वापरत असल्यास गेट मधून कुठे वळले यावरून शोध घेणे थोडे सोपे होईल.
३. घराबाहेर पडताना त्यांच्या अंगावरील कपडे (प्रकार, रंग )  व वस्तू यांची व्यवस्थित माहिती द्यावी , जेणेकरून शोध घेता येईल. त्यासाठी त्यावर लक्ष ठेवायला हवे .
३. GPS चे ब्रेसलेट , GPS वाल्या चपला/बूट अश्या गोष्टी शक्य असल्यास वापराव्या . बाहेर जाताना शक्य असल्यास मोबाईल गळ्यात चेन ने अडकवावा
४. Apple tag आणि jio tag यांचा वापर करता येऊ शकेल पण हे ब्लु टूथ च्या कनेक्शन नुसार काम करतात , त्यामुळे प्रवासात यांचा अधिक फायदा होऊ शकेल . Jio कम्युनिटी च्या मदतीने टॅग ची position समजू शकते .
५.लूटमार होऊ नये म्हणून अंगावर मौल्यवान वस्तू सहसा ठेवू नये (शक्यतो)
६. बाहेर गेल्यावर त्यांना कधी एकटे सोडू नये . तुम्ही दुकानातून बाहेर येईपर्यंत रुग्ण गाडीतून उतरून निघून जाऊ शकतात .
७. जागोजागी सूचना लिहून ठेवाव्यात .
८. डिमेंशियाच्या वरच्या पायऱ्यांवर रुग्णांसाठी सतत काळजीवाहक नेमावा (शक्य असल्यास )
९. रुग्णांसाठी विविध activity चे नियोजन करावे जेणेकरून ते कंटाळणार नाहीत .

डिमेंशिया रुग्ण हरवणे अश्या घटना पूर्णपणे टाळणे अशक्य असले तरी प्रयत्न नक्कीच करू शकतो.

अशी घटना घडल्यावर समूह , समाज म्हणून आपणा सर्वांची जबाबदारी देखील मोठी आहे .
शोधमोहीम आपल्या सहकार्याशिवाय शक्य नाही (रविवारच्या घटनेमध्ये सर्वांनी छान साथ दिल्याने ते आजोबा लवकर सापडले.  )
आपल्या परिसरात गोंधळलेली व्यक्ती दिसल्यास चौकशी करावी व पोलिसांना कल्पना द्यावी.
एखादी शोध मोहिम सुरु असल्यास आपल्या परीने अवश्य मदत करावी .
अशी वेळ कोणावर येईल सांगता येत नाही .
तरुण मंडळे स्थानिक शोधमोहिमांमध्ये साहाय्य करू शकतात .

It takes a village to raise a child and it also takes a village to keep an elderly safe .

Let’s do our part ! Let’s keep our elders safe !

#डिमेंशिया_जाणूया_DrPriya 4
#रुग्णशुश्रुषा_सहाय्य_DrPriya 32

(27/06/2023)

मूळ fb पोस्टची link

रुग्ण घराबाहेर पडण्याची कारणे आणि टाळण्यासाठी उपाय
रुग्ण घरातून निघून जाऊ शकतो हे सुचवणाऱ्या धोक्याच्या खुणा
रुग्ण अशी वाक्ये म्हणत असल्यास हरवण्याची शक्यता वाढते

काही महत्वाच्या लिंक्स

रुग्णाविषयी माहितीची नोंद ठेवायची असल्यास या document चा उपयोग होईल . 

https://www.alz.org/help-support/caregiving/stages-behaviors/wandering

Wandering? Or walking about? When people with dementia leave the house unattended.

(Follow the Dr Priya Insights channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbA7LZaJkK7EtKS0ta1J )


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com