तुमच्या – माझ्यामध्ये HMPV च्या अँटिबोडीज आहेत?

(पोस्ट ऐकायची असल्यास लिंक शेवटी दिलेली आहे. )

होय, हे सत्य आहे.

शेवटी एक अतिशय सुंदर पेपरची लिंक देईन जो वैद्यकीय व्यावसायिक वाचू शकतात. पेपर २००६ मध्ये प्रसिद्ध झालेला आहे.

तर झाले असे की, २००१ मध्ये एक विषाणू सापडला , मग असे लक्षात आले की तो नवा  नाही, तो गेली पन्नास वर्षे या जगामध्ये सर्वांना बाधित करतच आहे. ( म्हणजे साधारण १९५० पासून जगभरात पसरलेला आहे)

आणि जेव्हा त्याबद्दल अधिक अभ्यास केले गेले तेव्हा असे समजले की, जन्मतः देखील आपल्या बाळांमध्ये या विषाणूविरुद्ध इम्युनिटी असते जी त्यांना आईपासून व नंतर आईच्या दुधापासून मिळते.

वयोगटा नुसार HMPV च्या अँटीबोडीज असण्याचे प्रमाण

वय वाढताना ती इम्युनिटी कमी झाली की बाळांना याचा संसर्ग होतो आणि बाळ पाच वर्षाचे होईपर्यंत जवळपास 90 टक्के बाळांना याचा संसर्ग होऊन याची इम्युनिटी निर्माण झालेली असते.

प्रत्येक प्रौढ व्यक्ती म्हणजे जवळजवळ 100% प्रौढ व्यक्तींमध्ये HMPV विरुद्ध अँटीबोडीज उपलब्ध आहेत.

१००% प्रौढांमध्ये सहसा इम्युनिटी उपलब्ध असते.

तरी देखील अधून मधून याचे पुन्हा इन्फेक्शन होऊ शकते हे लक्षात ठेवायला हवे.

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जंतू विरुद्ध जनतेमध्ये आधीच अँटीबोडीज उपलब्ध असतात, त्याचे कधीच pandemic येऊ शकत नाही. छोट्या मोठ्या साथी येऊ शकतात किंवा उद्रेक होऊ शकतात.

त्यामुळे chill pill घ्या आणि निवांत रहा.
सर्दी सारखे श्वसनाचे आजार टाळण्यासाठी नेहमीची  काळजी घेत रहा.

बातम्या बघून घाबरण्याऐवजी कॉमेडी शो समजून एन्जॉय करा.

  • डॉ प्रिया प्रभू. GMC, Miraj
    (७/१/२५)

आजाराची इत्यंभूत माहिती देणारा 2006 मधील हा शास्त्रीय लेख

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC1539100/

पोस्ट ऐकण्यासाठी युट्युब ची लिंक

https://youtu.be/-lc9m51f4X0?si=2WicdTe3aVeK7akl


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com