रिकामे स्तन जास्त दूध तयार करतात

बाळ दीड दोन महिन्याचे झालं की तुम्हाला असं कधी वाटलं का की आता स्तन दाटत नाहीत पूर्वीसारखे , घट्ट होत नाहीत. 

आणि मग त्यामुळे “आता दूध कमी झालं असेल” असा विचार तुमच्या मनात आलाय का?

आणि असा विचार आल्यामुळे बाळाला पाजताना ‘स्तन जडावेपर्यंत वाट बघायची’ म्हणून तुम्ही अधिक वेळाने बाळाला पाजायला सुरू केली आहे का?

तुम्ही स्तनांना भरलेले ठेवत असाल तर खूप मोठी चूक करत आहात!  कारण रिकामे स्तन नव्या दुधाने भरले जातात.  भरलेले स्तन दूध निर्मिती कमी करतात.

तुम्हाला  बाळाला पुरेसे व भरपूर दूध हवे असेल तर त्यासाठी अतिशय खात्रीचा एकच मार्ग आहे .

आणि तो म्हणजे ‘स्तनातील दूध काढून ते रिकामे करणे’! 

मग ते स्तन बाळाला पाजून रिकामे होतील किंवा हाताने किंवा पंप वापरून दूध काढल्याने रिकामे होतील. ते रिकामे होणे महत्त्वाचे! 

याचे कारण खूप सोपे आहे.  आईच्या दुधामध्ये FIL म्हणजे Feedback  Inhibitor of Lactation हे एक व्हे प्रोटीन असते.  या प्रोटीनचे काम स्तनांमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक दूध तयार होऊ नये याची काळजी घेणे हे असते. हे प्रोटीन असते तर सतत दूध तयार होऊन दुधाच्या गाठी झाल्या असत्या.

FIL – दूध कमी करणारे प्रोटीन

जेव्हा जेव्हा काही कारणाने स्तन आईच्या दुधाने भरलेले राहतात , अशा स्तनांमध्ये FIL देखील जास्त प्रमाणात असते . त्यामुळे अशा स्तनामध्ये नवदूध निर्मिती कमी होऊ लागते.

एखादी माता घट्ट स्तन म्हणजे जास्त दूध अशा गैरसमजातून बाळाला वारंवार दूध न पाजता स्तन घट्ट होण्याची वाट बघत बसेल तर अशा मातेमध्ये स्तनात शिल्लक राहिलेल्या FIL मुळे दूध निर्मिती कमी होऊ लागते.

बाळ दीड दोन महिन्याचे झाल्यानंतर आईचे स्तन घट्ट न होणे हे नॉर्मल आहे.  कारण आता शरीराला अंदाज आलाय की बाळ साधारण किती दूध पितो म्हणून जास्तीचे दूध तयार होत नाही. अशावेळी आपली दूध निर्मिती कमी झाली आहे अशी शंका आईने मनात आणता कामा नये.

जर तुमचे स्तन मऊ लागत असतील तर याचा अर्थ त्या स्तनांमध्ये नवदुध निर्मिती वेगाने होत आहे हे लक्षात घ्या. बाळाने स्तन चोखणे सुरू केले की लगेच दूधही तयार होणे सुरू होते.  कारण स्तन हे टाकी सारखे नाही तर विहिरी सारखे असतात याविषयी यापूर्वी मी लिहिले आहेच (लिंक)

आपल्या मनातील कमी दुधाच्या शंकेमुळे गैरसमजातून बाळासाठी वरचे दूध चालू करू नका,  बाळाला पाजणे कमी करू नका . त्या ऐवजी, दूध वाढवायचे असेल तर बाळाला वारंवार पाजा, बाळाची स्तनावरची पकड (latch) योग्य आहे याची खात्री करा, आणि ब्रेस्ट कॉम्प्रेशन या पद्धतीचा वापर करा. याविषयीची माहिती जुन्या लेखांमध्ये सापडेल.

डॉ. प्रिया प्रभू, मिरज

(११/८/२०२४)


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com