खरंच आज्जी बाळाला पाजतेय?

Written by:

जर दुधनिर्मिती एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे तर कोणीही स्त्री स्तनपान करू शकेल, हो ना ? आपल्याला केवळ योग्य ते सिग्नल आपल्या शरीराला द्यायला हवे !

ही प्रतिक्षिप्त क्रियेची गोष्ट मी वारंवार का बरे सांगते?

कारण आईच्या मनात जर आत्मविश्वास असेल आणि आपले शरीर दूध निर्माण करू शकेल ही खात्री असेल तर ती योग्य तंत्र शिकून दूध निर्मिती वाढवेल. आणि जर अशी खात्री नसेल तर मनात शंकासुर येईल आणि दूध निर्मिती कमी होईल आणि विनाकारण ती स्वतःला दोषी समजेल.

लक्षात घ्या, केवळ प्रयत्न व इच्छा तुमचा प्रॉब्लेम सोडवू शकणार नाहीत ! योग्य प्रयत्न, ज्यामुळे प्रॉब्लेम आहे ती बाब दूर करणे, शरराला योग्य सिग्नल्स देणे अत्यावश्यक आहे, ज्याने स्तनपानाचा अनुभव मनासारखा आणि आनंददायी होईल! यासाठी योग्य शास्त्रीय माहिती आणि मार्गदर्शन उपयुक्त ठरेल.

पुन्हा दुधनिर्मिती सुरू करण्याच्या या क्रियेला relactation असे म्हणतात. हे अर्थात अगदी सहजसाध्य नसते पण अशक्यप्राय देखील नसते. त्यामुळे आपले दूध कमी झालेय म्हणजे काहीच होऊ शकणार नाही असे काही नाही. यासाठी आईला कुटुंबाचा सपोर्ट आवश्यक आहे. आईकडे इच्छाशक्ती व वेळ असायला हवा ! अनुभवी तज्ञाचे मार्गदर्शन ही प्रक्रिया सोपी करू शकते. कधी काही औषधांचा वापर केला जातो. कधी SNS सारख्या सहाय्यकारी बाबी वापरल्या जातात. मात्र स्तन चोखणे ही क्रिया अत्यावश्यक आहे! कारण स्तनांकडे मागणी नोंदवली जाईल तेव्हाच ती पूर्ण होईल ना! मग बाळ जर बाटलीमुळे निप्पल कन्फ्युजन मध्ये असेल तर आधी ते दूर करायला हवे . त्यासाठी paced bottle feeding करायला हवे. याबद्दलची पोस्ट इथे वाचता येईल.

फेसबुकवरील या पेज वर व्हिएतनामच्या या आज्जीचा फोटो आहे ज्यामध्ये relactation करून ती बाळाला पाजत आहे! त्या पोस्टच्या कमेंट्समध्ये बऱ्याच शंकांना उत्तरे दिलेली आहेत.

ही 2021 ची बातमी आहे ज्यामध्ये आज्जी wet nursing करते. Wet Nursing म्हणजे बाळाच्या आईशिवाय इतर कोणी बाळाला दूध पाजणे. फॉर्म्युला किंवा इतर प्राणिज दूध देण्याऐवजी मानवी दूध हे आईच्या दुधाखालोखाल सर्वोत्तम पर्याय असतो.

आज्जी देखील योग्य मार्गदर्शन व प्रयत्नाने स्तनपान देऊ शकते याबद्दल WHO च्या वेबसाईट वर देखील माहिती आहे . त्यांनी अनाथ मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी आज्जीचे साहाय्य घेतले आहे !

या relactation क्षमतेचा वापर करून बरेच दत्तक पालक स्तनपान देण्याचा अनुभव घेऊ शकतात. बऱ्याच माता फॉर्म्युला दुधाची गरज कमी करून आईच्या दुधाचे प्रमाण वाढवू शकतात.

कोणत्याही नव्या आईसाठी यातून एकच महत्वाचा संदेश आहे . स्तनांमधून दूध निघून ते रिकामे होत असतील तर नवे दूध नक्की तयार होईल. वयस्कर आज्या प्रयत्नांती स्तनपान देऊ शकत असतील तर तुमचे शरीर देखील योग्य प्रयत्नांना दाद देईल. आणि स्तनपान जमले नसेल तरी स्वतःला दोषी मानू नका कारण तुम्हाला हे तंत्र शिकवण्याची जबाबदारी इतरांची आहे .

जवळजवळ सर्व स्त्रियांमध्ये ही दुधनिर्मितीची अद्भुत क्षमता आहे! म्हणून प्रत्येक स्त्री खास आहे!


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “खरंच आज्जी बाळाला पाजतेय?”

  1. Swapnali avatar
    Swapnali

    Fantastic very encouraging for new mother who have lack of breast milk.

    1. drprdeshpande avatar
      drprdeshpande

      धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.