बाळ आजारी आहे हे स्तनांना कसे समजते?

स्तनपानाची क्रिया एक अद्भुत चमत्कारासारखी आहे! जणू हा आई व बाळा मधील शब्देविण संवाद असतो!

जेव्हा आई बाळाला प्रत्यक्ष स्तनपान करवते म्हणजे बाळ स्तनांमधून चोखून दूध पिते, अश्या वेळी बाळाच्या गरजेनुसार आईच्या दुधातील घटक बदलतात! याला tailer-made milk म्हणतात! म्हणजे प्रत्येक बाळाला जसे आवश्यक आहे तसे!

जेव्हा बाळ आजारी असते ना, तेव्हा आईच्या दुधातील रोगप्रतिकारक घटक , प्रतिपिंडे म्हणजे antibodies वाढतात! आणि आजाराशी लढण्यास बाळाला मदत करतात!

पण बाळ आजारी आहे आणि कोणते जंतू आहेत हे स्तनांना कसे समजते? त्या आजाराविरुद्ध प्रतिपिंडे दुधामध्ये कशी येतात?

हे घडते Retrograde Milk flow किंवा Spit Backwash मुळे!

म्हणजे काय?

बाळ स्तनांना चोखते तेव्हा तोंडामध्ये निर्वात पोकळी (suction vaccum) तयार होते! स्तनाग्रे किंचित सैलवतात. आणि बाळाच्या तोंडातील लाळ मिश्रित दूध त्या दुग्ध नलिकांच्या छिद्रांमधून स्तनांमध्ये जाते! याचे प्रमाण जरी अत्यल्प असले व यामुळे आईला काही धोका नसला तरी लाळेमध्ये असलेले जंतू आईच्या शरीराला सिग्नल देतात आणि त्या जंतूविरुद्ध प्रतिपिंडे आईच्या दुधामध्ये स्त्रावण्यास सुरुवात होते!

त्यामुळे बाळ आजारी असताना इतर काही खात नाही मात्र वारंवार आईचे दूध मागते! बाळालाही माहीत असते जणू , आईचे दूध त्याच्या आजारामध्ये त्याला साहाय्य करणार आहे!

हेच कारण आहे की स्तनपान देताना प्रथम पसंती प्रत्यक्ष स्तनपान देण्यास द्यावी. काही कारणाने तसे जमले नाही तर अप्रत्यक्षपणे म्हणजे स्तनातून काढलेल्या दुधाचा वापर करून स्तनपान द्यावे! कारण आईच्या दुधामध्ये रोगप्रतिकारक घटक नेहमीच असतात! बाळाच्या आजारपणात ते वाढतात व बाळ लवकर बरे होते!

निसर्गाच्या या करामतीला सलाम!

(अधिक माहिती हवी असल्यास पुढील लिंक बघा जी श्री. अजय जाधव यांनी फेसबुक पोस्टवरील एका कमेंट मध्ये शेयर केली होती! https://www.milkgenomics.org/?splash=baby-backwash-can-trigger-immune-response-in-milk&fbclid=IwAR2fizCS2nZP6EmKhYkHDTlFkCOipQ4YSdnuRPUAf8i5jwIQ3Mf0cMTTDQk#:~:text=When%20a%20human%20infant%20suckles%2C%20their%20tongue%20movements%20create%20a,ducts%20%5B1%2D3%5D )

डॉ प्रिया प्रभू (देशपांडे )

२७/०८/२०२३

drprdeshpande2@gmail.com


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

4 responses to “बाळ आजारी आहे हे स्तनांना कसे समजते?”

  1. Murlidhar Prabhu avatar
    Murlidhar Prabhu

    Thanks for nice information, with warm regards

    1. drprdeshpande avatar

      Thank you !

  2. Swapnali Chalukya Goyal avatar
    Swapnali Chalukya Goyal

    Thank You for this valuable information

    1. drprdeshpande avatar

      Thank you !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com