‘फिडिंग पिलो’ ( Feeding Pillow) वापरू का ?

फिंडिंग पिलो म्हणजे काय हे काहींना लगेच समजले असेल, नसेल समजले तर पुढील फोटो बघा!

आजकाल अश्या बाळाला पाजताना वापरायच्या खास उश्या विकत मिळतात . बरेच नवे पालक अश्या पाजताना वापरायच्या उश्या स्तनपानाची तयारी म्हणून आधीच घेऊन ठेवतात . या विविध प्रकारच्या असतात. जसे,

या उश्या वापरायच्या का हे ठरवण्याआधी मला काय सांगायचं आहे ते अवश्य वाचा .

या उश्या आईला साहाय्य म्हणून मार्केट मध्ये आल्या . बाळे जेव्हा खूप वेळासाठी स्तनपान करतात तेव्हा बाळाच्या वजनाने आईचे हात भरून येतात . तसेच पाठीलाही वेदना होऊ शकतात . हे टाळण्याचा वेगळा मार्ग असला तरी तात्पुरता उपाय म्हणून बाळाचे वजन हातांवर पडू नये यासाठी या उश्या वापरल्या जातात .

कल्पना जरी उत्तम असली तरी आपल्या या उश्यांमुळे स्तनपानामध्ये अडचणी येऊ शकतात. कसे ते सांगते .

तुम्ही माझ्या आधीच्या पोस्ट ( head tilt आणि योग्य पकडीबाबत ) वाचली असेल तर बाळाला स्तन देताना जर ते योग्य पद्धतीने दिले गेले नाही आणि बाळाला डोके हलवून मान थोडीशी मागे कलती करता आले नाही तर योग्य पकड होणार नाही हे लक्षात असेल. ‘Nose to Nipple’ मंत्र आठवतोय ना ?

प्रत्येक बाळ आणि आईची जोडी युनिक असते . त्यामुळे जर प्रत्येक आईच्या स्तनांचा आकार आणि बाळाचे शरीर वेगळे असेल तर बाजारात मिळणाऱ्या एकाच आकाराच्या फिडिंग पिलो चा कसा उपयोग होईल बरे !

सहसा आई पाजायला सुरू करताना फिडिंग पिलो मांडीवर घेते . नंतर बाळाला त्या पिलोवर ठेवते आणि मग आवश्यकतेनुसार पुढे झुकून किंवा ताठ बसून स्तन बाळाच्या तोंडपर्यंत नेते . यामध्ये योग्य अँगल ने स्तन दिले गेले नाही म्हणून deep latch होत नाही , स्तनाग्रे (निप्पल) दुखणे किंवा त्यावर चिरा पडणे असे त्रास सुरू होऊ शकतात . तसेच पाठीलाही ताण बसू शकतो. अर्थात काही आयांसाठी उशीची उंची योग्य असल्याने त्याचा त्रास होत नाही . म्हणजेच बसून पाजताना जर उशीची उंची तुमच्या आई-बाळ जोडीसाठी योग्य नसेल तर फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत.

मग उशी वापरायचीच नाही का , तर तसे नाही . Fixed उंचीच्या उशीपेक्षा घरातील लहान लहान उश्या वापरून आपल्याला हवी ती उंची मिळवता येऊ शकते . त्यासाठी सर्वात आधी nose to nipple मंत्र वापरून स्तनपान सुरू करायचे . त्यानंतर आईला आरामात बसण्यासाठी जितक्या उश्यांची गरज असेल तेवढ्या उश्या बाळाखाली तसेच पाठीमागे ठेवायच्या . आणि विकतची उशीच हवी असेल तर आज ही adjustable उशी पण दिसली मला . ही अशी एकाहून अधिक प्रकारच्या Holds मध्ये वापरता येईल . (Holds बद्दल पुढच्या पोस्ट मध्ये देईन माहिती ) पण अशी विकतची उशी घेतल्याशिवाय देखील स्तनपान व्यवस्थित करता येते .

वरील दोन नंबरच्या फोटोमधील उशी मात्र जर कमरेला योग्य अंतरावर बांधली तर आई स्तनपान उभ्याने किंवा फिरत देखील करू शकेल .

आई स्तनपान करत असेल तर तिला एका जागी , एका खोलीत , घरामध्ये असे अडकून राहण्याची गरज काय ? योग्य प्रकारच्या साहाय्याने स्तनपान करणारी आई देखील ऍक्टिव्ह आयुष्य जगू शकते !

फिंडिंग पिलो विकत घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा. घेणार असाल तर ती उशी वापरण्याचे आधी स्तनपान व्यवस्थित सुरू झालाय आणि मिल्क ट्रान्सफर होतंय (पोस्ट पहा ) याची खात्री करा , उंची तुमच्या आई-बाळ जोडीला योग्य असेल तर वापरू शकता !

अन्यथा आपल्या घरी उश्यांची कमी है क्या ? हव्या तितक्या व हव्या तश्या वापरा ! स्तनपान आरामदायी आणि आनंददायी बनवा !

-डॉ . प्रिया प्रभू

(ब्लॉग ला लाईक केल्यास भविष्यातील पोस्टबाबत मेल येईल आणि पोस्ट मिस होणार नाहीत. )


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com