पाजताना स्तनाने बाळाचे नाक दबले जातंय, काय करू?

हा प्रश्न तुम्ही कोणालाही विचारला की साधे उत्तर मिळते, “दुसऱ्या हाताच्या बोटाने स्तन दाबून नाकापासून दूर कर, बाळाचे नाक मोकळे कर” .

पण असे केल्याने एक तर आईचे मन निवांत न होता त्यामध्ये गुंतते , ‘बाळाला धरा, स्तन दूर करा’ वगैरे आणि त्यामुळे पान्हा कमी फुटू शकतो. तसेच, जिथे बोटाने दाब दिलेला असतो, तेथील दुग्ध नलिका दबली जाऊन स्तन पूर्ण रिकामा होत नाही किंवा कधी दुधाची गाठ देखील होऊ शकते !

आणि मुख्य म्हणजे स्तनावर दबले जाणारे नाक हे अयोग्य पकड म्हणजे incorrect latch असण्याचीही शक्यता असते . (फोटोची डावी बाजू बघा ) आणि जर स्तनावरील बाळाची पकड व्यवस्थित नसेल तर स्तनपानामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात .

मानवी स्तनपान समजून घेताना निसर्गतः इतर प्राण्यांचे स्तनपान कसे होते याच्याशी मी तुलना करते ! कारण स्तनपान विषयक बऱ्याच अडचणी केवळ आपण नैसर्गिक वागणुकीकडे वळलो की दूर होऊ शकतात. मागील पोस्ट मधील व्हिटॅमिन डी चे उदाहरण आहेच आपल्या समोर. नियमितपणे सूर्यकिरण आईच्या उघड्या अंगावर न पडण्याची किती मोठी किंमत चुकवतोय आपण.

जर प्राणी बोटाने स्तन बाजूला घेत नसतील तर तसे करण्याची माणसावर पण वेळ यायची गरज नाही. काहीतरी वेगळा उपाय असणार जेणे करून बाळाचे नाक स्तनावर दबले जाणार नाही !

बाळाचे नाक दबू नये म्हणून खरा उपाय आहे- “स्तनावरील योग्य पकड” ज्यामध्ये बाळाची मान किंचित उंचावलेली असावी जेणे करून बाळाची हनुवटी स्तनाला टेकेल आणि नाक आपोआप मोकळे राहील . (फोटो बघा )

प्रॉब्लेम काय होतो माहीत आहे का ? आपण स्तन बाळाला देताना जेवण भरवल्या सारखे देतो , पण स्तनपान हे जेवू घालण्यापेक्षा वेगळे आहे ना ! जेवणाचा घास जसा आपण अगदी तोंडाजवळ नेऊन भरवतो तसे स्तनाचे निप्पल बाळाच्या तोंडासमोर येईल अशा पद्धतीने आपण बाळ जवळ घेतो आणि मग बाळ अयोग्य पकड घेते. कधी कधी बाळाची मान पुढे वाकून बाळाचे नाक स्तनावर दबले जाते ! विशेषतः आईचे स्तन मोठे असतील तर असे होऊ शकते !

यावर उपाय अगदी सोपा आहे ! बाळाची मान पुढे न झुकता किंचित मागे झुकलेली असेल तर बाळाचे नाक दबले जात नाही, स्तनावरील पकड व्यवस्थित होते आणि बाळाचे पोट ही लवकर भरते ! तुम्ही म्हणाल की बाळाला सांगणार कसे की मान मागे झुकव ? सांगायचे कशाला , आपण आयडिया करायची!

बाळाला पाजायला घेताना स्तनाचे टोक (निप्पल) बाळाच्या नाकासमोर यायला हवे अश्या पद्धतीने बाळाला जवळ घ्यायचे ! निप्पलची दिशा नाकाकडे असावी (फोटो पहा ) याने होते काय की स्तन पकडण्यासाठी बाळाला मोठे तोंड उघडावे लागते आणि बाळाची हनुवटी टेकते स्तनाला , नाक मोकळे राहाते !

बाळाला जवळ घेण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत त्यांची माहिती गरोदर असतानाच घेऊन ठेवावी कारण गरजेनुसार आपण पद्धत निवडू शकतो , जसे cross cradle पद्धती मध्ये बाळाचे डोके हलवणे सोपे जाते .

बाळाची स्तनावरील पकड योग्य आहे की नाही हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत , त्याविषयी वेगळ्या पोस्ट मध्ये सांगेन माहिती! ब्लॉग ला like केल्यास नव्या पोस्टचे मेल पाठवले जातात व पोस्ट मिस होत नाही .

मान खाली झुकवून जर आपण आरामात पाणी पिऊ शकत नसू तर बिचारे बाळ तरी कसे दूध पिऊ शकेल ? करून बघा हवे तर , पाणी पिणे मान मागे झुकवली की सोपे जाते. त्यामुळे मान कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

पण चिंता करायची नाही. एकच मंत्र लक्षात ठेवायचा !

“Nose to Nipple”

Happy Feeding !

डॉ. प्रिया प्रभू.


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “पाजताना स्तनाने बाळाचे नाक दबले जातंय, काय करू?”

  1. Dr Baride JP avatar

    Probably many doctors and mothers knew this however logic is very well explained by you. Congratulations and would like to read more and more!

    1. drprdeshpande avatar

      Thank you so much Dr Baride Sir for the encouraging words

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com