स्तनपानाबद्दलचा सर्वात छान सल्ला (भाग १)

फेसबुक वर मी बरीच सक्रिय असते आणि वेगवेगळ्या विषयांवर लिहीत असते. तिथे लुसी वेबर या स्तनपानतज्ञाने इतर स्त्रियांना “तुम्हाला सर्वात उत्तम असा स्तनपानाबद्दलचा कुठला सल्ला मिळाला होता?” असा प्रश्न विचारला . आणि तिला तिच्या विविध वाचकांनी छान प्रतिसाद दिला. त्यामधील जे सर्वोत्तम सल्ले आहेत ते मी पुढील एक दोन भागांमध्ये तुम्हाला सांगेन.  कधीही स्तनपानाची अडचण आली की तुम्ही या सल्ल्यांना लक्षात ठेवू शकता.

१. Breastfeeding is natural like walking , not like breathing. It’s something you both have to learn to do.

२. Breast milk is natural, Breastfeeding is learnt.

हे दोन्ही सल्ले मी एकत्र ठेवले कारण या दोन्हींमध्ये एक महत्त्वाचा मेसेज आहे. बऱ्याच वेळा आईला असं सांगितलं जातं की स्तनपान नैसर्गिक आहे. त्यामुळे असं वाटतं की प्रत्येकीला आपोआप जमायला हवे .

पण लक्षात घ्या स्तनपान हे एक कौशल्य आहे आणि ते शिकावं लागतं. आईला आणि बाळाला पण. म्हणून पहिला सल्ला आहे की स्तनपान जरी नैसर्गिक असेल तरी ते श्वास घेण्यासारखं नैसर्गिक नाहीये तर चालण्यासारखं नैसर्गिक आहे. चालणं लहान बाळांना शिकावं लागतं, श्वासासारखे आपोआप सुरू होत नाही.  सुरुवातीला बाळे धडपडतात पण नंतर शिकतात चालायला. तसंच स्तनपानामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात याविषयी आधीच माहिती घेतली की मग स्तनपानाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त त्रास होत नाही आणि आई आणि बाळ लवकरच स्तनपान व्यवस्थित करायला शिकतात.

३. It doesn’t matter if the latch ‘looks’ good, if it is painful for you, something needs to be adjusted.

हा खूप महत्त्वाचा सल्ला आहे. बऱ्याचदा स्तनपान करताना बघून असं सांगितलं जातं की बाळाची स्तनावरची पकड ही बरोबर आहे . पण जर आईला स्तनपान देताना दुखत असेल तर फक्त लॅच योग्य ” दिसतेय ” यावर विश्वास न ठेवता काय सुधारणा करता येईल हे तपासावे लागेल. आईचा अनुभव हा सर्वात महत्त्वाचा.

४. Babies feed not only for food but also for a snacks, a drink, for warmth, comfort, pain relief, boredom, tiredness and for connection.

स्तनपान हे केवळ बाळाची भूक भागवण्यासाठी आहे हा खरंच गैरसमज आहे. कारण लहान बाळ विविध कारणांनी स्तनपान करत असतात. कधी त्यांना काही दुखत असेल, कंटाळा आला असेल, थकले असतील, आईच्या जवळ जावे वाटत असेल, तहान लागली असेल, थंडी वाजत असेल, थोडा विसावा हवा असेल, किंवा सहज थोडसं काही खावं वाटत असेल जसे आपण काहीतरी थोडसं snacks खातो . अशा विविध कारणांनी बाळे आईला दूध पिण्याबाबत मागणी करतात.

पण हे माहीत नसल्याने बाळ वारंवार दूध पिते म्हणून आई आपलं दूध कमी झालंय असं समजते आणि विनाकारण वरचे दूध सुरू करते. बाळाने दूध केवळ भूक भागवायलाच मागितले हा गैरसमज दूर ठेवायला हवा.

५. You can’t overfeed a baby , so keep going.

आजच फेसबुक वर कोणी कमेंट केली की बाळाच्या ओव्हर फीडिंग बाबत पण पोस्ट लिहा. पण खरं सांगू का स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये ओव्हर फीडिंग होणं हा प्रकार सहसा नसतो. कारण आपण बाळाला हवं तेव्हा आणि बाळाला हवं तेवढं दूध देत असतो – म्हणजे demand  feeding देतो. मागणीनुसार स्तनपान घेणाऱ्या बाळांना ओव्हर फीडिंग होत नाही. त्यामुळे बाळाला हवं असेल तेव्हा बिनधास्त आईचे दूध पिऊ द्या. बाळ त्याच्या भुकेनुसार दुधाची मागणी करते आणि म्हणून ओव्हर फिडिंगची चिंता करू नका.

पुढील पोस्टमध्ये अजून काही सल्ले बघूया आणि तुम्हाला पण कोणी स्तनपान बद्दल खूप छान सल्ला दिला असेल तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा.

– डॉ. प्रिया प्रभू , मिरज.


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com