आईचे दूध कमी झालेय की बाळाची वाढ (Growth  Spurt) झालीए?

बाळ जसजसे वाढू लागते तसतशी आईच्या मनात शंका निर्माण होते की बाळाला आपले दूध पुरतंय की नाही.

याची बरीच कारणं असू शकतात. महत्त्वाचं कारण आहे की बाळ वारंवार दूध प्यायला मागतेय म्हणून आईला शंका येते . दुसरं महत्त्वाचं कारण आहे की बाळ सारखं रडतं किंवा दूध पिल्यानंतर जास्त वेळ झोपत नाही, म्हणून आईला तसे वाटू शकते. कधी बाळ किरकिरे होते .

पण आई असा विचार करतंच नाही की “आपलं दूध कमी झालेलं नसून बहुदा बाळाची भूक वाढली असेल का?”

असे घडू शकते,  कारण बाळ वाढताना काही ठराविक काळाच्या टप्प्यांमध्ये बाळामध्ये जलद वाढ म्हणजे Growth Spurt होत असतात. बाळाची वाढ रोज रोज थोडी थोडी न घडता टप्प्याटप्प्याने व  काही आठवड्याच्या अंतराने घडत असते.

ही Growth Spurt बाबत महत्त्वाची माहिती आपल्याला नसल्याने जेव्हा जेव्हा बाळाची जलद वाढ होते आणि बाळाचे वागणे बदलते तेव्हा तेव्हा पहिली शंका मात्र “आईच दूध पुरतंय का ?” अशीच मनामध्ये येते आणि त्यामुळे विनाकारण वरचे दूध सुरू केले जाते आणि मग असे केल्याने आईचे दूध हळूहळू कमी होते.

प्रत्येक बाळ वेगळे असले तरी पहिल्या वर्षभरात ग्रोथ स्पोर्ट येण्याच्या सर्वसामान्य वेळा पुढील प्रमाणे आहेत साधारण पहिले सात ते दहा दिवस किंवा दुसरा आठवडा, चौथा ते सहावा आठवडा, तिसरा महिना, सहावा महिना, नववा महिना, आणि बारावा महिना.

Growth spurt timing and breastfeeding tips

ग्रोथ स्पर्ट शारीरिक वाढीचे असू शकते किंवा बाळाने एखादी नवी गोष्ट शिकली असेल तर त्याच्या मेंदूच्या वाढीचाही ग्रोथ स्पर्ट असू शकतो.

बाळ ग्रोथ स्पर्ट मध्ये आहे हे कसे ओळखावे?

Growth Spurt मधील बाळे सहसा दूध पिण्यासाठी वारंवार मागणी करतात.  काही बाळे जरी दूध पिले असेल तरी पुन्हा पुन्हा पिण्यासाठी मागतात ज्याला क्लस्टर फीडिंग असे म्हणतात.  काही मुलांची झोप ही कमी होऊ शकते त्यामुळे ते सारखे उठतात. बाळ किरकिरे बनू शकते.  या लक्षणांमुळे असे वाटते की बाळाचे पोट भरतच नाहीये आणि आई चिंतीत होते.

Signs of growth spurt

त्यामुळे बाळाचे वागणे,  खाणे पिणे,  झोपेचा प्रकार अचानक बदलले तर अशावेळी चिंतित होऊ नका. आपल्याला बाळाला ‘ डिमांड फीडिंग’  द्यायचे आहे  म्हणजे जेवढ्या वेळा बाळ प्यायला मागेल तेवढ्या वेळा आणि जेवढा वेळासाठी बाळ मागेल तेवढ्या वेळासाठी.  त्यामुळे बाळाला हवे तेवढ्या वेळेला दूध पिऊ दिले की ग्रोथ स्पर्ट जेव्हा संपतो तेव्हा बाळ पुन्हा शांत होतं . तोपर्यंत आईचं दूध देखील वाढतं आणि बाळाची गरज ही पूर्ण होते.

तुमचे प्रश्न कमेंट मध्ये अवश्य विचारा तसेच या ब्लॉगला सबस्क्राईब करा म्हणजे नव्या पोस्ट तुम्हाला इमेल मध्ये समजतील.

– डॉ प्रिया प्रभू

Miraj


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

3 responses to “आईचे दूध कमी झालेय की बाळाची वाढ (Growth  Spurt) झालीए?”

  1.  avatar
    Anonymous

    माझे बाळ ७ महिन्याचे आहे , त्याचे २ प्रॉब्लेम आहेत

    १. तो आता वरच खातोय आणि अंगावर पण पितोय , पण तो दुपारी रात्री झोपेत अचानक रडतो आणि उठतो, मग याचा अर्थ काय समजावा , त्याच पॉट भरत नाही की अजून काही issue आहे

    २. तो ३ दिवसांनी एकदा शी करतोय , हे नार्मल आहे का

    1. drprdeshpande avatar

      आधी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर .

      २. सहसा रोज शी झालेली बरी असते पण शी करताना बाळाला काही त्रास होत नसेल, बाळ रडत नसेल , बाळाला दुखत नसेल, शी घट्ट खडा होत नसेल , बाळाला कुंथायची गरज भासत नसेल तर अधिक काळजी करण्याची गरज नाही .
      मात्र वरचे अन्न सुरू केल्यावर बाळाला पाणी देखील द्यायला हवे आणि बाळाच्या अन्नामध्ये मऊ फळे वा शिजवलेल्या भाज्या देखील असतील याची काळजी घ्या .
      ७ व्या महिन्यात मुख्य अन्न आईचे दूधच असावे , वरचे अन्न १ ते ३ वेळा देण्यास हरकत नाही .

      १. बाळ रडण्याची अनेक कारणे असू शकतात, तसेच बाळ स्तनपान करण्याचीही भुकेहून अधिक कारणे असू शकतात .

      त्यामुळे बाळ उठल्यावर इतर काही कारण नाही हे बघून स्तनपान हवे असल्यास अवश्य द्यावे .

      सध्या उन्हाळा वाढत असताना बाळाच्या कम्फर्ट ची काळजीही घ्यावी . तसेच अंगात काही काचत नाही हेही तपासावे .

      1.  avatar
        Anonymous

        प्रथम तुम्ही दिलेल्या प्रतिकियेबद्दल धन्यवाद

        त्याला शी नार्मल होते आणि तो कुंथतो पण अगदी नार्मल

        आणि त्याला भाज्या कोणत्या द्याव्या हे समजले तर बरे होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com