*दुखरे आणि चिरा पडलेले निप्पल्स*

हा फोटो बघणे देखील किती वेदनादायी आहे न! कल्पना करा कि अश्या परिस्थितीमध्ये काही आयांना स्तनपान द्यावे लागते तेव्हा किती वेदना होत असतील. पण सहसा आईला सांगितले जाते कि “स्तनपान सुरु करताना थोडे दुखणारच , सहन करायला हवे. होईल हळूहळू सवय ..”

पण सवय न होता त्रास वाढत रहातो, बाळाला दुध पाजण्याची भीती मनात बसते, वेदनांची भीती मनात बसते, आणि शंकासुर जसे दुध कमी करतो तसेच भीती दुध बाहेर पडण्याचा मार्ग रोखून दुध बाळापर्यंत पोचू देत नाही.

त्यामुळे पुन्हा सांगेन कि स्तनपान कधीही वेदनादायी नसते हे पक्के ध्यानात ठेवा. वेदना जाणवत असतील तर त्याची करणे शोधून ती लगेच दूर करायला हवीत.

जर बाळाला पाजल्यावर किंवा पाजताना निप्पल म्हणजे स्तनाग्र दुखत असेल , त्यावर चिरा पडल्या असतील किंवा जखम झाली असेल तर त्यावर योग्य ते उपचार अवश्य करा.

सर्वप्रथम बाळ योग्य रीतीने स्तनावर पकड (latch) घेत आहे ना याची खात्री करून घ्या. योग्य पकड असेल तर स्तनाग्र दबले जात नाहीत . (याआधीच्या पोस्ट मध्ये योग्य पकड ओळखण्याबाबत माहिती दिली आहे . पोस्ट इथे वाचता येईल. ) latch दुरुस्त करता आला कि वेदना कमी होतात . यासाठी तज्ञांची मदत घेऊ शकता किंवा विविध टिप्स चा वापर करून स्वतः प्रयत्न करू शकता.

स्तन वारंवार साबण व पाण्याने धुतले जात असतील तर ते बंद करा . स्तन वारंवार धुण्यातील धोके इथे वाचता येतील.

जर या अडचणी नसतील तर बाळाच्या तोंडामध्ये पांढऱ्या बुरशीचा संसर्ग आहे का हे नक्की तपासा , कधी कधी त्यामुळे आईच्या निप्पल ला जखमा होऊ शकतात.

ओलसर निप्पल pad सतत निप्पल च्या संपर्कात असेल तरीही असा त्रास होऊ शकतो. त्यांचा वापर करत असाल तर काळजी घ्या.

पंपचा वापर करणाऱ्या आईला देखील हा त्रास होऊ शकतो. अश्या वेळी पंप च्या flange चा साईझ योग्य आहे ना हे तपासावे व कमी suction वापरून पंप करावे.

कधीकधी बाळाची जीभ व्यवस्थित मोकळी नसते- tongue tie असू शकतो . याविषयी तज्ञाकडून तपासणी करून एका लहानश्या ऑपरेशन ने tie release केल्यास स्तनपान व्यवस्थित होऊ शकते.

या उपायांसोबतच निप्पलची जखम बरी व्हावी व आईला वेदना होऊ नयेत यासाठी उपाय करायला हवेत.

स्तनातील शेवटच्या दुधाचे काही थेंब पिळून काढून जखमेला लावावे. आणि ते स्तनावर वाळू द्यावेत. आईचे दुध लावणे व air dry करणे हे जखम भरण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. अर्थात त्रासाचे वरीलपैकी जे कारण असेल ते तर दूर करायलाच हवे.

वेदना कमी करण्यासाठी स्तनपानापूर्वी अर्धा तास वेदनाशामक गोळी घेणे तसेच स्तनाग्राला बर्फ लावणे असे उपाय करता येतील. तसेच स्तनपान झाल्यावर टॉवेल गरम पाण्यात भिजवून आणि पिळून स्तनाग्रांवर काही मिनिटे ठेवता येईल.

मिठाच्या पाण्याने स्तनाग्र पुसून घेणे किंवा त्या पाण्यामध्ये स्तनाग्र काही मिनिटे बुडवून पुसून घेता येतील.

lanolin क्रीम चा वापर करता येईल. खोबरेल तेल देखील वापरता येऊ शकेल. स्तनपान देण्यापूर्वी ते पुसून घेतले तरी चालते.

बाळ रडण्यापूर्वी स्तनाला लावणे तसेच कमी दुखऱ्या स्तनाकडून आधी पाजणे असे उपाय करता येतील.

फारच त्रास असल्यास हाताने दुध काढून ते बाळाला देता येईल. यासाठी cup feeding करता येईल.

स्तनाग्रचा भाग ओला रहाणार नाही याची काळजी घ्यावी. गरज वाटल्यास nipple cover वापरणे जेणे करून कपड्यांचा स्पर्श वेदनादायी होणार नाही.

nipple shield चा वापर विचारपूर्वक, तज्ञांच्या सल्याने तसेच ते सोडवण्याबाबत चर्चा करून मगच करावा .

मात्र लक्षात ठेवा कि जोपर्यंत मूळ कारण दूर होत नाही तोपर्यंत निप्पलाला जखमा होत राहणार . मात्र त्या टाळणे नक्कीच आपल्या हातात आहे. बाळाची स्तनावरील पकड खोलवर असली कि सर्व अडचणी दूर होऊ शकतात. अशी पकड मिळवण्याबाबत व्हीडीओ इथे पाहता येईल.

वेदनेकडे कधीही दुर्लक्ष करू नका.

-डॉ. प्रिया प्रभू. (२२/११/२३ )

वेदनादायी निप्पल्स आणि latch बाबत व्हिडीओ लिंक – https://www.youtube.com/watch?v=oxonUxaNUbA


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com