स्तनपानाचे अवघड विश्व

Published on

in

बाळाचा जन्म ही खरं तर किती सुंदर घटना , पण त्या क्षणापासून आईला एक मोठी जबाबदारी मिळालेली असते जी बाळाच्या जन्माचा आनंद पूर्णपणे उपभोगू देत नाही !

“मला पुरेसे दूध येईल का? ” आणि “बाळाला दूध पुरतंय ना?” या दोन शंकासुरांनी आयुष्य व्यापून जाते!

कधी दूध कमी तर कधी दूध जास्त आहे म्हणून किंवा कधी निप्पलला जखमा झाल्यात किंवा कधी स्तन दाटलेत म्हणून , फक्त चिंता , चिंता आणि चिंता !

स्तनपानासारखा अप्रतिम अनुभव मिळणे प्रत्येक आई व बाळाचा हक्क आहे आणि त्यासाठी योग्य माहिती आणि सहाय्य देण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे!

मी एक वैद्यकीय शिक्षक आहे , मेडिकलच्या विद्यार्थ्यांना गेली १७ वर्षे शिकवते ! एक आई आहे जिने स्तनपानासंबंधी अडचणींचा सामानाही केला आणि प्रयत्नपूर्वक स्तनपान सुरू देखील ठेवले ! BPNI या स्तनपान प्रमोशन संस्थेकडून प्रशिक्षित आहे आणि विविध विषयांवर शास्त्रीय व योग्य माहिती देण्याचा छंद आहे!

स्तनपानासंबंधी गैरसमज दूर करून, अडचणींवर मात करून आत्मविश्वासाने स्तनपान करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती माझ्या पोस्ट मधून मिळेल !

वाचा व इतरांनाही सांगा ! तुमच्या प्रश्नांचे स्वागत आहे .

चला, आनंद पसरवूया !


Discover more from Dr Priya Insights

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “स्तनपानाचे अवघड विश्व”

  1. dg72blog avatar

    चला, योग्य माहिती पसरवूया !… 👍👏

    Share this:

    1. drprdeshpande avatar

      धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.


नमस्कार!

विज्ञान आणि विश्वासार्ह माहितीच्या या डिजिटल मंचावर तुमचे स्वागत आहे. इंटरनेटवर आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत असताना, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अचूक आणि सोप्या भाषेतील वैद्यकीय ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच या लेखनाचा उद्देश आहे. जागरूक राहा, सुरक्षित राहा!

स्तनपानाविषयी शास्त्रीय माहिती आणि उपयुक्त टिप्स देखील इथे तुम्हाला मिळतील. तुमचा प्रश्न तुम्ही सर्च करू शकता. किंवा खालील categories मध्ये शोधू शकता.

तुम्हाला हा लेख कसा वाटला? इंटरनेटवरच्या अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानाची सत्य बाजू समजून घेणे केव्हाही उत्तम! हा लेख तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि जागरूक राहा. तुमचे प्रश्न मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा!


Join the Club

Stay updated with our latest tips and every new post by submitting your mail id.


माझे इतर सोशल मीडिया लिंक्स

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी जे जे आवश्यक ते ते इथे सापडू शकेल. तुमच्या प्रश्नांचे आणि प्रतिक्रियांचे स्वागत – संपर्क- drprdeshpande2@gmail.com